आश्वी - पतीच्या मृत्यूनंतर विधवा पत्नीचे सौभाग्यलेणे ठेवले कायम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

आश्वी (नगर) : समाजातील अनेक पिढ्यांपासून चालत आलेल्या रुढी व परंपरांना छेद देत, नवीन पायंडा पाडण्याची सुरवात ग्रामीण भागात झाली आहे. पतीच्या निधनानंतर सौभाग्यलेणे नसल्याने समाजात मानाने मिरवण्याचा हक्क डावलणाऱ्या रुढी व परंपरा मोडून, संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमाला येथील सुशिक्षित शेतकरी कुटूंबाने वयाची सत्तरी गाठलेल्या वृद्धेचा सन्मान जपला आहे.

घरातील पुरुष मयत झाल्यानंतर त्याच्या विधवेचे झालेल्या कुंकू पुसून टाकून, गळ्यातील मणीमंगळसूत्र काढले जाते तसेच तिच्या बांगड्याही फोडण्याची पद्धत गेल्या अनेक दशकांपासून रुढ आहे. मात्र संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमाला येथील खंडू शेळके (वय 90) यांच्या निधनानंतर त्यांच्या विधवा झालेल्या सत्तर वर्षीय पत्नी सत्यभामा शेळके यांची सर्व सौभाग्यलेणे तशीच ठेवून, त्यांना समाजात मानसन्मान देण्याचे काम शेळके परिवाराने केले आहे. 

संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमालाचे सरपंच व महाराष्ट्र दारूबंदी आंदोलनाचे सदस्य अॅड. मीनानाथ शेळके, आर्ट ऑफ लिव्हींगचे साधक संदीप शेळके, तसेच लोकपंचायतचे अमोल शेळके यांचे आजोबा खंडू भानू शेळके यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यानंतर त्यांच्या परिवारातील विधवा झालेल्या ज्येष्ठ महिला सदस्याचे अहेवपणाचे सर्व लेणे, अलंकार तसेच ठेवले. अंत्यविधीनंतर मयत व्यक्तीची रक्षा नदीत सोडल्यामुळे होणारे जलप्रदूषण टळण्यासाठी खंडू शेळके यांचे मुलगे रावसाहेब, आनंदा, बापुसाहेब, बाळासाहेब, ज्ञानेश्वर व मीनानाथ शेळके, रतन कासार यांनी आपल्या शेतात खड्डा घेऊन त्यात रक्षा टाकून, सर्व कुटूंबियांच्या उपस्थितीत चिकूचे झाड लावले. या रुपाने त्यांची आठवण कायम समरणात ठेवण्याचा प्रयत्न या कुटूंबाने केला आहे.

Web Title: after death of husband wife continued with her mangalsutra