सरकारच्या मदतीनंतरही सूतगिरण्या अडचणीत 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जुलै 2018

वस्त्रोद्योगात राज्यात अव्वल असलेल्या इचलकरंजीतील आठ सूतगिरण्यांसह पुणे विभागातील 27 सूतगिरण्या अडचणीत सापडल्या आहेत. त्यांच्याकडे 484 कोटी 31 लाखांची थकबाकी आहे. 
 

सोलापूर : वस्त्रोद्योगात राज्यात अव्वल असलेल्या इचलकरंजीतील आठ सूतगिरण्यांसह पुणे विभागातील 27 सूतगिरण्या अडचणीत सापडल्या आहेत. त्यांच्याकडे 484 कोटी 31 लाखांची थकबाकी आहे. 

आधुनिक तंत्रज्ञानानंतरही राज्यातील वस्त्रोद्योग पारंपरिक पद्धतीनेच सुरू असल्याचे दिसून येते. सरकारने अनुदानाच्या माध्यमातून राज्यातील सूतगिरण्यांना अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; परंतु अद्यापही काही सूतगिरण्या सावरलेल्या नाहीत. वाहतूक खर्च, कापसाचे दर, कुशल कामगारांची कमतरता, विजेचे दर, निर्यातीचे धोरण, बाजारपेठेचा अभाव, उत्पादित मालाचे पडलेले दर यासह अन्य कारणांमुळे राज्यातील वस्त्रोद्योग डबघाईला आल्याचे चित्र आहे.

सध्या सुरू असलेल्या बहुतांशी सूतगिरण्यांकडेही बॅंकांचे कर्ज असून, राज्यातील सूतगिरण्या सुरळीत चालाव्यात यासाठी सरकारने अनुदानाच्या स्वरूपात ठोस मदत करण्याची गरज आहे, अशी मागणी सूतगिरणी चालकांकडून होत आहे. 

Web Title: after government help soot girni also facing problems