गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर २२२० जणांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 सप्टेंबर 2016

सांगली - जिल्ह्यातील ४६०६ सार्वजनिक गणेश मंडळांची पोलिस दलाकडे नोंदणी झाली आहे. १ लाख २५ हजार घरगुती गणपतींची स्थापना झाली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर २२२० जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक  कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी पत्रकार 

परिषदेत दिली.

 

सांगली - जिल्ह्यातील ४६०६ सार्वजनिक गणेश मंडळांची पोलिस दलाकडे नोंदणी झाली आहे. १ लाख २५ हजार घरगुती गणपतींची स्थापना झाली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर २२२० जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक  कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी पत्रकार 

परिषदेत दिली.

 

शिंदे म्हणाले,‘‘यंदाचा गणेशोत्सव डॉल्बीमुक्त साजरा व्हावा म्हणून पोलिस दलाने प्रयत्न केले. तब्बल २४० बैठका घेतल्या. तब्बल १३६९ मंडळांनी डॉल्बीमुक्तीचा ठराव केल्यामुळे अध्यक्षांचा सत्कार केला. पोलिस ठाणे स्तरावर विघ्नहर्ता पुरस्कार गणेशमंडळांना दिला जाईल. ध्वनिप्रदूषण कायद्याचा भंग केल्यास कारवाई करता यावी म्हणून ७८ अधिकारी व ३२५ पोलिस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. काही गणेश मंडळांनी वर्गणीची रक्कम जलयुक्त शिवार योजनेला देण्याचे जाहीर केले. त्यातून गणराया व विघ्नहर्ता बंधारे पूर्व भागात बांधले जातील.’’

 

श्री. शिंदे म्हणाले,‘‘गणेशोत्सव शांततेत पार पाडावा म्हणून तीन गुन्हेगारांना तडीपार केले. तसेच विविध कलमांनुसार तब्बल २२२० जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली. दंगल काबू योजनेचा २५ पोलिस ठाणे हद्दीत सराव घेतला आहे. जिल्ह्यात ४६०६ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची  नोंदणी झाली आहे. तर १ लाख २५ हजार घरगुतींची स्थापना करण्यात आली आहे. १२५ गावांत एकच गणपती बसवला गेला आहे. गणेशोत्सव शांततेत पार पाडावा म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.’’

२८०० पोलिसांचा बंदोबस्त

गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर अधीक्षक, अपर अधीक्षक, उपाधीक्षक-७, निरीक्षक-१९, उपनिरीक्षक-१०७, पोलिस कर्मचारी-१७१५, महिला पोलिस-२१५, राज्य राखीव दल- ६०, होमगार्ड-१००० याप्रमाणे २८०० हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे.

६१ मंडळांचा वचननामा

जिल्ह्यातील ६१ मंडळांनी वर्गणीची रक्‍कम जलयुक्त शिवार योजनेस देणार असल्याचा वचननामा दिला आहे. एक मंडळ बेटी बचाव-बेटी पढाव योजना राबवणार आहे.

 

Web Title: Against the backdrop of the 2220 people Ganesh