कामगारांच्या मजूरी वाढीच्या प्रश्‍नावरुन सौदे बंद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 डिसेंबर 2016

कोल्हापूर : गुळ बाजारात आज माथाडी कामगारांनी जादा मजूरी वाढ मागण्याच्या मुद्यावरुन जोरदार वादावादी करत काम बंद आंदोलन केले. परिणामी गुळ बंद राहिले. तब्बल दोन तास बाजारसमितीत शेतकरी, अडते, व्यापारी यांची बैठक झाली. पण ठोस निर्णय होऊ शकला नाही. सौदे होऊनही मालाचा उठाव बंद झाला. गतवर्षीचाच कित्ता गिरवत ऐन हंगामात माथाडी कामगारांनी सौदे बंदचा खो घातला आहे. 

कोल्हापूर : गुळ बाजारात आज माथाडी कामगारांनी जादा मजूरी वाढ मागण्याच्या मुद्यावरुन जोरदार वादावादी करत काम बंद आंदोलन केले. परिणामी गुळ बंद राहिले. तब्बल दोन तास बाजारसमितीत शेतकरी, अडते, व्यापारी यांची बैठक झाली. पण ठोस निर्णय होऊ शकला नाही. सौदे होऊनही मालाचा उठाव बंद झाला. गतवर्षीचाच कित्ता गिरवत ऐन हंगामात माथाडी कामगारांनी सौदे बंदचा खो घातला आहे. 

बाजारात गुळाची आवक नियमितपणे सुरू आहे. गुळाला भावही चांगला आहे. ऐंशी हजार गुळ रवे सौदे प्रतीक्षेत आहे. असे असताना सौदे सुरू झाले. त्यानंतर काही वेळातच बॉक्‍स भरण्याचे आम्हाला जादा पैसे द्यावेत अशी मागणी करत माथाडींनी वादावादी सुरू केली. बाजार समितीतील अधिकारी व सचिव मोहन सालपे यांनी मध्यस्ती करीत माथाडींना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी माथाडींचा एक गटाने आम्ही काम करणार नाही या भूमिकेवर ठाम राहिला. तर काही माथाडी काम सुुरु करू, सौदे संपल्यानंतर बैटक घेवून चर्चा करू अशी भूमिका घेतली. तर काहींनी जाणीवपूर्वक वाद वाढवत सौद्यातून माघार घेतली. त्यामुळे तोलाई व पॅकींग मालाचा उचल अशी कामे बंद पडली. परिणाम सौदे काढणे अशक्‍य झाले. त्यानंतर शेतकऱ्यांनी तुमचा वाद सौद्यानंतर मिटवा, आमचे नुकसान करु करा अशी विनवणी केली. पण माथाडी कामगार आपल्या मागण्यावरुन हटले नाहीत. अखेर बैठक घेवून तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला. जे काम वेळेत पूर्ण होत नाही त्या कामासाठी तुम्हाला जादा वेळ द्यावा लागत असेल तर जादा पैसे मागून कसे चालेल, बाजाराची कोंडी करु नका, तुमच्या कामाचा योग्य मोबदला ठरल्याप्रमाणे देण्यात येइल असे बाजारसमितच्या पदाधिकाऱ्यानीं कामगारांना सागितले. तरीही समाधान झाले नाहीं. दोन तास चर्चेतूनही मार्ग निघला नाही. यामुळे सौदे बंदच राहिले. 

गेल्या वर्षीही माथाडी कामगांनी ऐन वेळी मजूरी वाढीचा मुद्दा काढत काम बंद आंदोलन सुरु केले. व सलग तीन दिवस सौदे बद पाडले होते. वास्तविक माथाडींना किती मजूरी द्यावी याबाबत लेखी करार झाले आहेत. तरीही कोणतीही पूर्व सुचना न देता ऐनवेळी काम बंद करुन सौद्यांची कोंडी करायची असा प्रकार केला होता. यंदा गुळाची आवक वाढलेली असताना थोड्या फोर फरकाने स्वत:च मुद्दा पुढे करुन माथाडींनी सौदे बंद पाडले आहेत. शेतकऱ्यांची आणि व्यापाऱ्यांची कोंडी करायची असा अठ्ठाहास काही मोजक्‍या माथाडी नेत्यांकडून घडत आहे. अशा नेत्यांना चाप बसविण्यासाठी बाजारसमिती काय पावले उचलणार याबाबत उत्सुकता गुळ सौदे वर्तुळात आहे.

Web Title: agitation for increase in labor wages stall kolhapur market