सांगलीत रावसाहेब दानवेंचा धिक्कार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 मे 2017

काँग्रेसतर्फे पुतळ्याचे दहन, राष्ट्रवादी महिलातर्फे आंदोलन, शिवसेनेतर्फे मुंडण 
सांगली - भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांना ‘साले’ असे अनुद्‌गार काढून त्यांचा अवमान केला आहे. सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय  केला असून शेतकऱ्यालाच सरकारचे प्रतिनिधी शिवी देत आहेत. ही कसली लोकशाही आहे? याच्या निषेधार्थ शहर जिल्हा काँग्रेसतर्फे दानवेंच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे आंदोलन, तर मिरज तालुका शिवसेनेतर्फे मुंडण आंदोलन करण्यात आले. 

शेतकऱ्यांची तूर खरेदीवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबाबत अवमानकारक उद्‌गार काढल्याच्या निषेधार्थ काँग्रेस समितीसमोर काँग्रेसच्या वतीने आंदोलन झाले. एकीकडे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होतात. त्यांची आर्थिक व मानसिक गळचेपी होत असताना भाजप प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या डोक्‍यात सत्तेची नशा गेल्याने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला आहे, अशी प्रतिक्रिया शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिली.

शेतकऱ्यांकडे अद्याप हजारो टन तूर शिल्लक आहे. सरकारने ती सारी तूर विकत घ्यायलाच पाहिजे. पक्षाने दानवे यांच्या पदाचा राजीनामा घ्यावा. शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आली. 

या वेळी जावेद शेख, कयुम पटवेगार, रफिक मुजावर, राजन पिराळे, धनराज सातपुते, नितीन कुरळपकर, संतोष पाटील, सुजाता होदार, नगरसेविका शेवंता वाघमारे, विजय जाधव, पैगंबर शेख, जमन नायकवाडी, करिम मेस्त्री, निहाल महात उपस्थित होते.

शिवसेनेतर्फे मुंडण आंदोलन
भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकरांच्या विषयी अपशब्द केल्याबद्दल मिरज तालुका शिवसेनेतर्फे निषेध करत मुंडण आंदोलन केले. यावेळी रावसाहेब दानवे यांच्यावर कारवाई करून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी संदीप शिंत्रे, महादेव मगदूम, जितेंद्र शहा, संजय जाधव, सचिन ढेरे, प्रभाकर कुरळपकर, रुपेश मोकाशी, सुधीर चव्हाण आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे दानवेंचा धिक्कार
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीतर्फे राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर आंदोलन झाले. महिला कार्यकर्त्यांनी दानवेंच्या निषेधाच्या घोषणा देत त्यांचा धिक्कार केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या विधानसभा क्षेत्राध्यक्षा डॉ. छाया पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज महिलांनी रावसाहेब दानवे यांच्या निषेधार्थ आंदोलन केले. या आंदोलनात जयश्री सावंत, अनिता पांगम, आयेशा शेख, वंदना चंदनशिवे, कांचन पळसे, लता कुकडे, मीनाक्षी आरते, लक्ष्मी गडकरी, नलिनी सपाटे, उषा पाटील, कविता पाटील, अरुणा खेमलापुरे आदी उपस्थित होत्या.