संगमनेर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात पिता-पुत्र जखमी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

धांदरफळ शिवारातील घटना; दोन शेळ्या केल्या ठार

तळेगाव दिघे (जि. नगर) : संगमनेर तालुक्यातील धांदरफळ शिवारात गुरुवारी पहाटेच्या सुमारास शेळ्यांच्या कळपावर बिबट्याने हल्ला करीत दोन शेळ्या ठार केल्या. शेळ्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या पिता-पुत्रावर बिबट्याने हल्ला करीत गंभीर जखमी केले. या घटनेने परिसरात घबराट पसरली आहे.

धांदरफळ शिवारात गुरुवारी (ता. 3) पहाटेच्या सुमारास बिबट्याने शेळ्यांच्या कळपावर हल्ला केला. या हल्ल्यात दोन शेळ्यांचा मृत्यू झाला. साहेबराव म्हस्कुले व त्यांचा मुलगा राजेंद्र म्हस्कुले पहाटे झोपेत होते. घरासमोर बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्याने अंधारात हल्ला चढविला. शेळ्यांच्या ओरडण्याचा आवाजाने म्हस्कुले पिता-पुत्र जागे झाले. शेळ्यांना वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या म्हस्कुले पिता-पुत्रावर बिबट्याने हल्ला करीत पायाला, तोंडाला जखमी केले.

दोघाही पिता-पुत्रास संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या घटनेने परिसरात घबराट पसरली असून वन विभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.