शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे यांना विशेष कार्यगौरव पुरस्कार प्रदान

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जुलै 2017

राहुरी (अहमदनगर): कै. प्रा. हरिश्चंद्र पंडीतराव गित्ते यांच्या सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त हरिसुख प्रतिष्ठानच्या वतीने राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांच्या हस्ते परळी येथे "संन्मान कर्तृत्वाचा" हा विशेष कार्यगौरव पुरस्कार देऊन शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे यांना संन्मानित करण्यात आले.

मुंडे म्हणाल्या, 'शाहिरी प्राचिन महाराष्ट्राची परंपरा आहे. या परंपरेचा वारसा पुढे चालवणारे शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे हे एक पथिक आहेत. शाहिरीतून छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र समोर ठेवत असताना इतिहास आणि भविष्यकाळाची योग्य सांगड घालीत शिवशाहिर तनपुरे हे समाजसुधारणेचे काम करीत आहेत. आपण आणी आपली शाहीरी असे मर्यादित काम आपल्याला करता आले असते. परंतु, दुखीतांचे आश्रू जाणण्याची जाण आपल्याला असल्यानेच छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेल्या समाजसुधारणेवरही त्यांनी भर दिला आहे. अपंगासाठी शिर्डी येथे शिवाश्रम, व्यसनमुक्ती, अपंगाना मदत असे बहुआयामी उत्तुंग कार्य तनपुरे महाराज करीत आहेत.'

महाराज ढोक म्हणाले, 'अपंग असुनही त्यांनी अवघा महाराष्ट्र आपल्या पहाडी आवाजाने गाजवला याचा अर्थ डॉ. विजय तनपुरे यांच्या पाठीमागे कोणीतरी दैवीशक्ती आहे, हे आपणास मान्य करावे लागेल. शिर्डी येथे अंध, अपंग व वृध्दांसाठी शिवाश्रमाच्या निर्मितेचे कार्य करणारे आंतरराष्ट्रीय शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे यांनी समाजासमोर एक फार मोठा आदर्श घालून दिला आहे.'

सत्काराला उत्तर देताना तनपुरे महाराज म्हणाले, 'अपंगानी आपले काय गेले यापेक्षा काय शिल्लक आहे, याचा विचार करावा. शिवाश्रम हे भगवंताचे कार्य आहे, मी फक्त निमित्त आहे.' कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेश गित्ते यांनी आभार मानले.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: