स्वाईन फ्लूने शिक्षकाच्या पत्नीचा मृत्यू; प्रतिबंधात्मक उपाययोजनांची मागणी

हरिभाऊ दिघे
बुधवार, 19 जुलै 2017

संगमनेर तालुक्यात यापूर्वीदेखील स्वाईन फ्लूने नागरिकांचे बळी घेतले आहेत.

तळेगाव दिघे (जि. नगर) : स्वाईन फ्लूच्या आजाराने संगमनेर येथील एका माध्यमिक शिक्षकाच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुरेखा श्रीकांत माघाडे (वय 43) असे मृत महिलेचे नाव आहे.

संगमनेर येथील सहयाद्री विद्यालयात कार्यरत शिक्षक श्रीकांत सर्जेराव माघाडे यांच्या पत्नी सुरेखा माघाडे यांना हृदयाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना नाशिक येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्या रक्त चाचण्या केल्या असता स्वाईन फ्लूची लक्षणे आढळून आली.

उपचारादरम्यान सोमवारी रात्री सुरेखा माघाडे यांचा मृत्यू झाला. मंगळवारी त्यांच्यावर संगमनेर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सुरेखा माघाडे या खाजगी क्लासेस चालवत होत्या. त्या बामसेफ संघटनेचे कामही करत होत्या. त्यांच्या अकाली दुर्दैवी निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

संगमनेर तालुक्यात यापूर्वीदेखील स्वाईन फ्लूने नागरिकांचे बळी घेतले आहेत. त्यामुळे आरोग्य खात्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात येत आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :