अजित पवार करणार फुटिरांची चंपी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

उद्या येताहेत साताऱ्यात; राष्ट्रवादीत राजीनामा नाट्य सुरूच
सातारा - विधान परिषदेच्या निवडणुकीतील सांगली-साताऱ्याचा निकाल जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागला आहे. पदाधिकाऱ्यांचे राजीनामा नाट्य सुरू असतानाच चुका केलेल्यांना कानमंत्र देण्यासाठी शुक्रवारी (ता. 25) माजी उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्ह्यात येत आहेत.

दरम्यान, शेखर गोरेंनी आज श्री. पवार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून फुटिरांची माहिती दिली. जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी पदाचा राजीनामा विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे सुपूर्द केला.

सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील पराभवानंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून काल जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी राजीनामा दिला. यानंतर आज दुसऱ्या दिवशीही पक्षात राजीनामा नाट्य सुरूच राहिले. आज जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी पदाचा राजीनामा दिला. दोन्हीही पदाधिकाऱ्यांचे राजीनामे प्रदेशाध्यक्षांनी स्वीकारलेले नाहीत. उलट विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी या दोघांचीही कानउघडणी करून कामाला लागा, असे सुनावले आहे. दरम्यान, बारामतीवरून काय निरोप येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच येत्या शुक्रवारी (ता. 25) माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथी कार्यक्रमासाठी जिल्ह्यात येत आहेत. या वेळी ते या पराभवावर जिल्ह्यातील नेत्यांची मते जाणून घेऊन फुटिरांची चंपी करणार आहेत, तसेच ज्यांनी चुका केल्या त्यांना कानमंत्रही देणार आहेत. दरम्यान, शेखर गोरेंनी आज अजित पवार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करून फुटिरांची नावे त्यांच्या कानावर घातल्याचे सांगितले जात आहे.

वसुलीची धास्ती...
विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे काम न करणाऱ्या "निष्ठावंतां'कडून "वसुली' मोहीम राबविली जाण्याची भीती असल्याने अनेक पदाधिकारी व सदस्यांत अस्वस्थता निर्माण झाली आहे.

Web Title: Ajit Pawar in satara