गर्भपात करणाऱ्या डॉक्‍टर दांपत्याला अटक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

अकलूज - लिंग तपासणी आणि गर्भपातप्रकरणी येथील एका डॉक्‍टर दांपत्याला शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात येत आहे. दरम्यान, 28 ऑगस्टपर्यंत या दांपत्यास पोलिस कोठडी मिळाली आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मल्लिकार्जून पट्टणशेट्टी यांनी शुक्रवारी सांगितले. 

डॉ. तेजस प्रदीप गांधी व डॉ. प्रीती तेजस गांधी असे या डॉक्‍टर दांपत्याचे नाव आहे. अकलूजमध्ये सिया मॅटर्निटी अँड नर्सिंग होमच्या नावाखाली हा प्रकार सुरू होता. 

सातारा जिल्ह्यात गर्भपातप्रकरणी झालेल्या एका कारवाईनंतर गर्भपाताची पाळेमुळे अकलूजमध्ये असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सातारा जिल्हा शल्य चिकित्सकांनी याबाबत सोलापूरचे शल्य चिकित्सक पट्टणशेट्टी यांना या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर डॉ. पट्टणशेट्टी आणि "लेक वाचवा' अभियानाच्या ऍड. वर्षा देशपांडे यांनी या दांपत्याला पुराव्यानिशी पकडले आहे. येथील गांधी दांपत्याच्या सिया मॅटर्निटी अँड नर्सिंग होमच्याभोवती आज पहाटे त्यांनी सापळा लावला होता. 

दांपत्यावर तीन गुन्हे 
सातारा जिल्ह्यात भ्रूण हत्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांच्या तक्रारीनंतर आता अकलूज येथे गर्भपातप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. विनापरवाना सोनोग्राफी केंद्र चालवून लिंगनिदान केल्याप्रकरणी डॉ. पट्टणशेट्टी हे थेट न्यायालयात गुन्हा दाखल करणार आहेत. 

गर्भपात करणारे कुटुंब 
आज अटक केलेला डॉ. तेजस हा डॉ. प्रदीप गांधी यांचा मुलगा आहे. 2007 ते 2010 दरम्यान अकलूजच्या डॉ. प्रदीप गांधी यांच्याविरोधात असाच गुन्हा दाखल झालेला होता. त्या वेळी डॉ. तेजस यांच्यावर मशिन ऑपरेटर म्हणून काम केल्याचा आरोप होता. या गुन्ह्यातून या बाप-लेकांची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता झाली आहे. त्यानंतर आता पुन्हा डॉ. तेजस हा पत्नीसह गर्भपातप्रकरणी अटकेत गेल्याने गर्भपात करणारे कुटुंब अशी या परिवाराची चर्चा होत आहे. 

ज्यांनी गर्भपात करून घेतले असतील त्यांनी किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी आम्हाला माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याची नावे गोपनीय ठेवून आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे, यासाठी आमचा प्रयत्न आहे. 
- डॉ. मल्लिकार्जून पट्टणशेटी