किसान सभेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी ढवळे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

अकोले - किसान सभेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी डॉ. अशोक ढवळे, तर राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून माजी खासदार हन्नन मोल्ला यांची नुकतीच फेरनिवड झाली, अशी माहिती मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते डॉ. अजित नवले यांनी दिली.

हिस्सार (हरियाना) येथे नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय किसान सभेच्या 34 व्या अधिवेशनामध्ये ही निवड करण्यात आली. या अधिवेशनात अखिल भारतीय किसान सभेच्या केंद्रीय समितीवर महाराष्ट्रातून किसन गुजर व डॉ. अजित नवले यांची आणि राष्ट्रीय कौन्सिलवर सुभाष चौधरी, रडका कलांगडा, अर्जुन आडे व सिद्धप्पा कलशेट्टी यांची निवड झाली.