रंगभूमी निरीक्षण मंडळावर देशपांडे, देखणे यांची निवड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

सोलापूर - महाराष्ट्र शासनाच्या रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाच्या सदस्य पदी सोलापूरचे ऍड. आनंद देशपांडे आणि शिरीष देखणे यांनी निवड झाली आहे.

सोलापूर - महाराष्ट्र शासनाच्या रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाच्या सदस्य पदी सोलापूरचे ऍड. आनंद देशपांडे आणि शिरीष देखणे यांनी निवड झाली आहे.

ऍड. देशपांडे यांची फेरनिवड झाली आहे, तर देखणे यांची प्रथमच निवड झाली आहे. देखणे प्रामुख्याने नाटककार म्हणून ओळखले जातात. त्यांच्या अनेक नाट्यसंहितांना लेखन आणि प्रयोगासाठी पुरस्कार मिळाले आहेत. ऍड. देशपांडे यांनी "जाणता राजा'मध्ये शाहिराची भूमिका गाजवली होती. मंडळाकडे आलेल्या नाट्य संहितांचे पूर्व परीक्षण करून योग्यता प्रमाणपत्र देण्यासाठी प्रचलित मंडळावरील अध्यक्ष व सदस्यांची सांस्कृतिक मंत्रालयाने नुकतीच फेरनियुक्ती करून मंडळाची पुनर्रचना केली. या मंडळावर आता नव्याने अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती झाली आहे. नवनियुक्त अध्यक्षपदी अरुण नलावडे यांची फेरनिवड करण्यात आली आहे.

Web Title: Anand-Deshpande-Shirish-Dekhane selection