अटल टिंकरिंग प्रयोगशाळा १३ शाळांत

Atal-Tickering-Laboratory
Atal-Tickering-Laboratory

सातारा - निती आयोगाच्या ‘अटल इनोव्हेशन मिशन’अंतर्गत ‘अटल टिंकरिंग प्रयोगशाळा’ निर्माण करण्यासाठी तीन हजार शाळांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे अटल टिंकरिंग प्रयोगशाळा असणाऱ्या एकूण शाळांची संख्या पाच हजार ४४१ होणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील १९६ शाळांचा समावेश असून, जिल्ह्यातील १३ शाळांची त्यात निवड केली आहे. 

देशातील माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये कल्पकता आणि उद्योजकतेची जोपासना व्हावी, या प्रयोगशाळा सुरू केल्या आहेत. या प्रयोगशाळांमुळे कल्पकता, नवनवे शोध यासाठी पोषक वातावरण निर्माण होऊन तंत्रविषयक कल्पकतेमध्ये परिवर्तन घडणे सुलभ होणार आहे.

युवावर्गाला थ्रीडी प्रिंटिंग, रोबोटिक्‍स, मायक्रोप्रोसेसर यासारख्या तंत्रज्ञानाचा परिचय सुलभ होईल. दैनंदिन जीवनातल्या स्थानिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठीचे केंद्र म्हणून या अटल टिंकरिंग प्रयोगशाळा काम करणार आहेत. ‘अटल टिंकरिंग लॅब’साठी निवड झालेल्या प्रत्येक शाळेला टिंकरिंग लॅब तयार करण्यासाठी पाच वर्षांच्या कालावधीत २० लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. डिसेंबर २०१७ मध्ये आठ, तर २०१८ मध्ये पाच विद्यालयांची यासाठी निवड केली आहे. 

यस, आय ॲम इनोव्हेटर!  
‘अटल टेंकरिंग लॅब’मुळे बालशास्त्रज्ञ तयार होणार आहेत. लहानपणीच वैज्ञानिक शास्त्राची आवड असलेल्या विद्यार्थिनी, विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहन देण्याकरिता ही प्रयोगशाळा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. लहान मुलांच्या मेंदूला आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे देऊन त्यांच्यातील शास्त्रज्ञ जागा करण्याचे प्रयत्न होतील.

निवड झालेल्या जिल्ह्यातील शाळा...
महाराजा सयाजीराव विद्यालय (सातारा), अण्णासाहेब कल्याणी विद्यालय (सातारा), यशवंत हायस्कूल (कऱ्हाड), महात्मा गांधी विद्यालय (उंब्रज), परशुराम शिंदे कन्या शाळा (दहिवडी), सद्‌गुरु गाडगे महाराज माध्यमिक विद्यालय (कऱ्हाड), जयराम स्वामी विद्यालय (वडगाव), सरस्वती विद्यालय (कोरेगाव), कन्या विद्यालय (वाई), आत्माराम विद्यालय (ओगलेवाडी), श्रीपतराव पाटील विद्यालय (सातारा), महात्मा गांधी विद्यालय (दहिवडी), श्री जानुबाई विद्यालय विरळी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com