एटीएमवर दरोडाप्रकरणी महिलेसह तिघे ताब्यात 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

सातारा, भुईंज - धारावी (मुंबई) येथे काल (ता. 16) रात्री एका एटीएम सेंटरवर पडलेल्या दरोड्यात सुमारे सव्वाकोटींची रोख रक्कम लंपास झाली. या गुन्ह्यात सहभागी झालेल्या महिलेसह तीन संशयितांना 15 लाख 40 हजार रुपयांसह ताब्यत घेण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले. 

आनेवाडी टोलनाक्‍याजवळ पोलिसांनी आज रात्री सात वाजण्याच्या सुमारास ट्रॅव्हल्स थांबवून त्यातून तीन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळ सुमारे साडेपंधरा लाख रुपये सापडले आहेत. या गुन्ह्याचा आणखी तपास व्हायचा असल्याने पोलिसांनी अधिक तपशील देण्यास असमर्थता दर्शविली, तसेच संशयितांची नावे उघड करू नयेत, अशी विनंती केली. 

पोलिस सूत्रांकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, काल रात्री धारावी येथे एटीएममध्ये पैसे भरत असताना दरोडेखोरांनी सव्वाकोटी रुपये लुटले होते. या गुन्ह्याच्या तपासात मुंबई पोलिस संशयितांच्या मागावर होते. त्यांना दरोड्यातील काही संशयित आज ट्रॅव्हल्समधून पुण्याहून बंगळूरला जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाशी संपर्क साधला. त्यानुसार सूत्रे फिरली. पोलिस आज दिवसभर आनेवाडी व तळबीड टोलनाक्‍यांवर लक्ष ठेवून होते. रात्री सात वाजण्याच्या सुमारास टॅव्हल्समधील महिलेसह तिघांना पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतले. त्यांच्याजवळ 15 लाख 40 हजार रुपये मिळाले आहेत. धारावीच्या दरोड्याच्या गुन्ह्यात आणखी आठ ते दहा जणांचा सहभाग असल्याची शक्‍यता पोलिस सूत्रांनी वर्तविली.