अविनाश मोहितेंसह चौघांना जामीन मंजूर 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

कऱ्हाड - शिवनगर येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यातील ऊसतोडणी वाहतूकदारांच्या बनावट कर्ज प्रकरणात कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते, उपाध्यक्ष सुरेश पाटील यांच्यासह चौघांना आज येथील फौजदारी न्यायाधीश आर. टी. गोगले यांनी जामीन मंजूर केला. श्री. मोहिते यांना या प्रकरणात फेब्रुवारीमध्ये अटक झाली होती. आजअखेर त्यांच्यासह अकरा जणांना जामीन मंजूर झाला आहे. 

अटक झालेले संचालक संभाजीराव जगताप, बाळासाहेब निकम, वसंत पाटील, महेंद्र मोहिते, चद्रकांत भुसारी, सर्जेराव लोकरे व उदय शिंदे यांना यापूर्वीच जामीन मंजूर झाला आहे. ऍड. श्रीकांत जाधव, ऍड. मोहन यादव यांनी मोहिते यांच्या वतीने न्यायालयात युक्तिवाद केले. सरकारी पक्षाचाही युक्तिवाद झाला. न्या. गोगले यांनी श्री. मोहिते, श्री. पाटील यांचा जामीन मंजूर केला. याप्रकरणी वाळवा येथील यशवंत पाटील यांना फिर्याद दिली होती. फेब्रुवारी महिन्यापासून अटकसत्र सुरू होते. 

प्रकरणात पुढे टप्प्या टप्प्याने 13 जणांना अटक झाली. त्यांच्या विरोधात काही दिवसांपूर्वी फौजदारी न्यालयात आरोपपत्र दाखल आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणे, बनावट कागदपत्रे तयार करणे, ती कर्जासाठी वापरणे यासह अनेक आरोप त्यात ठेवण्यात आले आहेत. प्रत्यक्ष फिर्याद 34 जणांविरोधात आहे. त्यापैकी सात जणांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यात बॅंकेचे पाच अधिकारी व दोन माजी संचालक आहेत. उर्वरित पोलिसांना अद्याप सापडलेले नाहीत.