सांगलीत 19 जानेवारीला निघणार बहुजन क्रांती मोर्चा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

सांगली - येत्या 19 जानेवारीला राज्यातील दहावा बहुजन क्रांती मोर्चा येथे काढण्यात येणार आहे. अभिजन सोडून सर्व अशा बहुजनांचा होणारा हा मेळावा राज्यातील सर्वाधिक संख्येचा असावा यादृष्टीने आज नियोजन समितीची बैठक झाली. सध्याच्या आरक्षणाला धक्का न लावता सर्वच जातीसमूहांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे यासह विविध मागण्यांसाठी राज्यभर हे मोर्चे निघत आहेत. त्यासाठी आज जिल्ह्यातील विविध जाती संघटनांच्या सहभागाने बैठक झाली. सांगलीत कर्मवीर चौकात मोर्चाचा केंद्रबिंदू असेल. 

खणभागातील "कष्टकऱ्यांची दौलत' कार्यालयात आज मोर्चाच्या नियोजनासाठी बैठक झाली. तीत ऍड. के. डी. शिंदे, सुनील होवाळे, अजित पाटील, मुफ्ती जुबेर, अमोल नांद्रेकर, नितीन कांबळे, प्रमोद सांगले, विकास सूर्यवंशी, नामदेव करगणे, अस्लम सय्यद, विकास मगदूम, संगीता शिंदे, युसूफ शेख, आर. पी. कांबळे, इरफान बारगीर आदी उपस्थित होते. बहुजन समाजातील अनुसूचित जाती, जमाती, भटके विमुक्त जाती जमाती, ओबीसी, मराठा, बलुतेदार, मुस्लिम, ख्रिश्‍चन, बौद्ध, लिंगायत, शीख, जैन अशा विविध जाती व अल्पसंख्याकांच्या प्रश्‍नांबाबत विद्यमान सरकार दुर्लक्ष करीत आहे. जातीधर्मात भांडणे लावून द्यायचे उद्योग सरकार करीत आहे. बहुजन क्रांती मोर्चा हा सरकारला इशारा देण्यासाठी आहे. जिल्ह्यातील सुमारे पन्नासवर पक्ष-संघटनांनी या मोर्चाला पाठिंबा जाहीर केला आहे. सर्व जातीसमूहांपर्यंत मोर्चाची भूमिका पटवून देऊन लढा तीव्र करण्यात येणार असल्याचे संयोजकांनी सांगितले. 

मोर्चाच्या मागण्या 
दलित अत्याचार कायदा अधिक कडक करून त्याच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र न्यायालय व यंत्रणा निर्माण करा, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, मुस्लिम पर्सनल लॉ मधील हस्तक्षेप थांबवा, सच्चर समितीच्या शिफारशी लागू करा, लिंगायतांना स्वतंत्र धर्म मान्यता देऊन अल्पसंख्याक दर्जा द्यावा, खिश्‍चनांवरील हल्ले थांबवा, अल्पसंख्याकांसाठी संरक्षण कायदा करा, जैन समाजाला राष्ट्रीय पातळीवर अल्पसंख्याक दर्जा द्या, बाबासाहेब पुरंदरे यांना दिलेला महाराष्ट्र भुषण पुरस्कार मागे घ्या, उमाजी नाईक यांना आद्य क्रांतिवीर घोषित करावे, बेरड-रामोशी समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण द्यावे, भटक्‍या विमुक्तांना ऍट्रॉसिटी कायद्याने संरक्षण द्यावे, या कायद्याचा गैरवापर करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, बहुजनांच्या नेत्यांवरील आकसापोटी झालेल्या कारवाया मागे घ्या, शेतमालाला दर देण्यासाठी स्वतंत्र अर्थसंकल्प मांडा, मागासवर्गीयांच्या शिष्यवृत्तीत वाढ करा, पारंपरिक व्यवसाय गमावलेल्या बलुतेदारांसाठी रोजगाराची साधने उपलब्ध करून द्या. 

Web Title: bahujan kranti morcha 19 jan