बंधुता साहित्य संमेलनाचे यंदा इस्लामपूर येथे आयोजन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जानेवारी 2017

इस्लामपूर - राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद व बंधुता प्रतिष्ठान (पुणे) तर्फे 2017 मध्ये होणारे 19 वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन यंदा येथे होणार आहे. अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी उद्धव कानडे यांची, तर स्वागताध्यक्ष म्हणून महेंद्र भारती यांची निवड करण्यात आली. ही माहिती संस्थापक अध्यक्ष प्रकाश रोकडे यांनी दिली. 

नवी पेठ पुणे येथे झालेल्या 18 व्या संमेलनात घोषणा झाली. त्या पार्श्वभूमीवर माहिती देताना महेंद्र भारती म्हणाले, ""स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या संविधानिक मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी बंधुता परिवारच्या वतीने 17 वर्षांपासून साहित्य संमेलन भरवले जाते. साहित्यातील नामवंतांनी सहभाग नोंदवून पाठबळ दिले. वाळवा तालुका आणि साहित्यिक, सांस्कृतिक व शैक्षणिक पार्श्वभूमी विचारात घेता 2017 मध्ये घेतले जाणारे संमेलन तालुक्‍याचे ठिकाण इस्लामपूर येथे घेतले जाणार आहे. या परिसरात सकस व दर्जेदार साहित्य निर्मिती होते. नवोदित लेखक व साहित्यिकांनाही ऊर्जा मिळेल अशी आशा आहे. साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान असणारे ज्येष्ठ कवी उद्धव कानडे संमेलनाध्यक्ष असतील.

पश्चिम महाराष्ट्र

कऱ्हाड : कोयना धरणाच्या पाणी साठ्यात चोवीस तासांत ०.२१ टीएमसीने वाढ झाली. कोयना धरणाचा पाणी साठा ८८.७५ टीएमसी झाला आहे...

01.54 PM

सांगली - स्वस्त धान्य दुकानदारांच्या प्रतिक्विंटल वितरण कमिशनमध्ये दुपटीहून अधिक वाढ करण्यात आली आहे. सध्या प्रतिक्विंटलसाठी...

12.33 PM

कोल्हापूर -  येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर), सावित्रीबाई फुले हॉस्पिटलसह काही रुग्णालयांतही ऑक्‍सिजन...

12.33 PM