जिल्ह्यात साडेतीनशे कोटींचे व्यवहार ठप्प

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 मार्च 2017

सांगली - युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियन्स अंतर्गत बॅंक कर्मचाऱ्यांच्या नऊ संघटनांनी एकत्र येऊन केलेल्या संपामुळे आज जिल्ह्यातील सुमारे 
साडेतीनशे कोटी रुपयांचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले. या संपात जिल्ह्यातील २७० राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या शाखा, तसेच रत्नाकर व फेडरल बॅंकेचे सर्व शाखा पूर्णपणे बंद होत्या.

बॅंक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी आज विविध मागण्यांसाठी बंद पाळला. केंद्र सरकारच्या प्रस्तावित कामगार कायद्याच्या विरोधात, बॅंकांमध्ये असलेले आऊट सोर्सिंग बंद करणे, सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, एन.पी.ए. वसुलीसाठी योग्य कायदे करणे, जाणीवपूर्वक बॅंकांची कर्ज बुडणाऱ्या धनाढ्य व्यक्ती यांच्या विरोधात गुन्हे दाखल करणे, पाच दिवसांचा आठवडा करणे, आदी मागण्यांसाठी हा संप करणत आला. शहरातील पटेल चौकातील बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. 

या वेळी समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत कट्‌टी, सचिव अनंत मराठे, अरविंद चौगुले, दीपक चव्हाण, अनंत बिळगी, संजय देशपांडे, उल्का तामगावकर, प्रताप पाटील आदींसह बॅंक कर्मचारी सहभागी झाले होते.

Web Title: bank transaction stop by employee strike