सावकार कुमार कुमसगेला 'मोका' लावण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 डिसेंबर 2016

सांगली - तीन आसनी रिक्षा चालक ते खासगी सावकार बनलेल्या कुमार कुमसगे याच्यावर गंभीर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. त्याला "मोका' लावून चार जिल्ह्यांतून हद्दपार करावे, अशी मागणी दलित संघटनांसह इतर संघटनांनी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याकडे केली. दरम्यान, जिल्हाधिकारी गायकवाड यांनी कुमसगेविरुद्ध दाखल गुन्ह्याची दखल घेत त्याचा शस्त्र परवाना निलंबित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सांगली - तीन आसनी रिक्षा चालक ते खासगी सावकार बनलेल्या कुमार कुमसगे याच्यावर गंभीर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. त्याला "मोका' लावून चार जिल्ह्यांतून हद्दपार करावे, अशी मागणी दलित संघटनांसह इतर संघटनांनी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याकडे केली. दरम्यान, जिल्हाधिकारी गायकवाड यांनी कुमसगेविरुद्ध दाखल गुन्ह्याची दखल घेत त्याचा शस्त्र परवाना निलंबित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, सांगली परिसरात अनेक सावकारांनी गरीब कर्जदारांची मालमत्ता हडप करत कोट्यवधी रुपये मिळवले आहेत. त्यापैकीच एक कुमार कुमसगे आहे. बीअर, वाईन शॉप, हॉटेल, रेस्टॉरंट, परमिट रूम थाटले आहे. सावकारीतून दादागिरी, पिस्तुलाचा धाक दाखवणे, कोऱ्या धनादेशावर सह्या घेणे अशा अनेक तक्रारी आहेत. फौजदारी व ऍट्रॉसिटीचे गुन्हे विश्रामबाग, संजयनगर, कुपवाड व शहर पोलिस ठाण्यात दाखल आहेत. नुकतेच बबन चावरे यांचे अपहरण करून डोक्‍याला पिस्तूल लावून मारहाण केल्याप्रकरणी संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. अशा व्यक्तीला शस्त्रपरवाना कसा आणि कोणत्या निकषावर दिला गेला?

कुमसगे हा पोलिस आणि फिर्यादीवर दबाव आणणे, साक्षीदार फितूर करणे, फिर्यादीवर व साक्षीदारांवर खोट्या केसेस दाखल करणे असे उद्योग करतो. त्याचा शस्त्र परवाना, बीअरबार परवाना, परमिटरूम परवाना, सावकारी परवाना रद्द करावा. त्याला मोका लावून हद्दपार करावे. कुमसगेसारख्या सावकारांवर कारवाई न झाल्यास आंदोलन केले जाईल.''

सुरेश दुधगावकर, सुनील कांबळे, उज्ज्वला वेटम, उत्तम मोहिते, नितीन गोंधळे, आकाश मानकर, अमित चव्हाण, अमोल वेटम, विकी पवार, अमित लांडगे, मुकेश सरोदे आदी विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

शस्त्र परवाना निलंबित करा-
शिष्टमंडळाने सावकार कुमसगेवरील गुन्हे आणि कारनाम्याची माहिती दिल्यानंतर जिल्हाधिकारी गायकवाड यांनी कुमसगेचा शस्त्र परवाना निलंबित करा, असे आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना शिष्टमंडळासमोरच दिले.

पश्चिम महाराष्ट्र

इस्लामपूर (सांगली) : राजू शेट्‌टींचा घसरलेला टीआरपी वाढविण्यासाठी ते माझ्यावर टीका करीत आहेत. त्यांनी अगोदर स्वतःच्या बुडाखालचा...

07.21 PM

पुणे / कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी 2050 पर्यंत केंद्रात भाजपची सत्ता राहील, असे विधान नुकतेच...

04.33 PM

सोलापूर : देवेंद्र फडणवीस होश मे आओ, पोलिस होश मे आओ, शाहू-फुले-आंबेडकर आम्ही सारे दाभोलकर या घोषणा देत सोलापुरातील समविचारांनी...

03.33 PM