सोलापुरात लागल्या पैजा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

सोलापूर - महापालिकेत भाजप नंबर वन ठरेल की कॉंग्रेस, शिवसेनेच्या किती जागा येणार, राष्ट्रवादी कॉंग्रेस अन्‌ "एमआयएम'ची मजल कुठपर्यंत राहणार, माळशिरस, मोहोळ अन्‌ माढ्यात काय होणार, झेडपीत सत्तेसाठी कोण कोणाच्या सोबत जाणार, अशा एक ना अनेक चर्चा मंगळवारी दिवसभर सुरू होत्या. जेवणासह रंगीत-संगीत पार्ट्यांच्या शर्यती निकालाच्या निमित्ताने लागल्या आहेत.

जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाच्या निकालाची उत्सुकता प्रत्येकाला लागली आहे. जिल्हा परिषदेच्या तुलनेत महापालिकेच्या निकालाची उत्सुकता अनेकांना आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या माध्यमातून भाजपने यंदाच्या निवडणुकीत सर्वार्थाने ताकद लावली आहे. महापालिकेत सर्वाधिक जागा मिळविणारा पक्ष कॉंग्रेस की भाजप, याबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यातच व्हॉट्‌सऍप आणि वृत्तवाहिन्यांवर फिरू लागलेल्या सर्व्हेमुळे या निवडणुकीत भाजप व शिवसेनेला चांगल्या जागा मिळण्याची आशा कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. शिवसेनेला सोबत घेतल्याशिवाय सत्ता स्थापन करणे कठीण असल्याने शिवसेना भाजपसोबत जाणार की कॉंग्रेससोबत, याबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे.