बेळगाव : स्वस्त धान्य दुकानांत आता ‘C.S.C.’

ग्रामीण भागासाठी योजना; ७१ शासकीय सेवा उपलब्ध, चालकांना प्रशिक्षण
Common service center started in rural grain food shops belgaum
Common service center started in rural grain food shops belgaumsakal

बेळगाव: ग्रामीण भागातील स्वस्त धान्य दुकानांमध्येही यापुढे कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) सुरू होणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकारशी संबंधित ७१ सेवा याठिकाणी उपलब्ध होतील. जिल्ह्यातील १० स्वस्त धान्य दुकानांमध्ये ही सेवा प्राथमिक टप्प्यात सुरू करण्यात आली आहे.‌शिधावितरणही आता ऑनलाईन झाल्यामुळे प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात संगणक, स्कॅनर, प्रिंटर यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे कोणतेही भांडवल नसताना स्वस्त धान्य दुकान चालक या ठिकाणी सीएससी केंद्र सुरू करू शकणार आहेत.

ज्यामुळे शिधा वितरणासाठी बायोमेट्रिक ओळख घेण्यासह नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज करणे, दुरुस्ती, नाव समाविष्ट करणे, शिधापत्रिका रद्द करणे, नवे आरोग्य कार्ड, पासपोर्ट अर्ज, वीजबिल, विमा पॉलिसीचा हप्ता भरून घेणे, बँकिंग सेवा, आधारकार्ड दुरुस्तीसह सरकारशी संबंधित सर्व सेवा याठिकाणी उपलब्ध करुन दिल्या जाऊ शकतात. या सीएससी केंद्रांमधून रेल्वे आणि विमान तिकीट आरक्षण केले जाऊ शकणार आहे.

सीएससी केंद्र सुरू करण्यासाठी स्वस्त धान्य दुकानचालकांना प्रशिक्षण दिले जात आहे. सध्या बेळगाव जिल्ह्यात १० सीएससी केंद्र स्वस्त धान्य दुकानात सुरु करण्यात आली असून मागणीनुसार इतर स्वस्त धान्य दुकानातही ही सेवा सुरु केली जाणार आहे. यापूर्वी २०१७ मध्ये स्वस्त धान्य दुकानात सीएससी सेवा सुरू करण्यासंबंधी सरकारने योजना आखली होती, पण तांत्रिक दोषामुळे त्याची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती.‌ मात्र, यावर्षी या योजनेला मूर्त रूप प्राप्त झाले आहे. जिल्ह्यात सुमारे ८०० स्वस्त धान्य दुकान आहेत. सध्या प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर ‘ग्राम वन’ सेवा सुरु करण्यात आली असून या ठिकाणीही केंद्र आणि राज्य सरकारचे संबंधित सर्व सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याच्या जोडीलाच आता स्वस्त धान्य दुकानामध्येही सीएससी केंद्रे सुरू केली जाणार आहेत.‌

रेल्वे आणि विमान तिकीट आरक्षणासह आधारकार्डमधील दुरुस्ती तसेच केंद्र व राज्य सरकारच्या ७१ सेवा स्वस्त धान्य दुकानातील सीएससी केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. इच्छुक स्वस्त धान्य दुकानचालक यासाठी अन्न आणि नागरी पुरवठा खात्याशी संपर्क साधू शकतात. त्यांना सीएससी सेंटरकडून युजर आयडी आणि पासवर्ड दिले जाईल. यासंबंधीचे प्रशिक्षणही दिले जात आहे.‌

- चन्नबसप्पा कोडली, सहसंचालक, अन्न आणि नागरी पुरवठा खाते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com