बेळगाव: 'क्रांतिवीर संगळ्ळी'चे अध्यक्ष आनंद अप्पुगोळ यांना अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

बेळगाव :  क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाळकृष्ण अप्पुगोळ यांना नुकतीच मुंबई येथून अटक केली. सदर सोसायटीतील ठेवीदारांच्या ठेवी दिल्या नसल्याचा ठपका ठेवत त्यांच्यासह 16 जणांवर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

क्रांतिवीर रायण्णा सोसायटीतील ठेवीदारांच्या 232.69 कोटी पककरुपयांच्या ठेवी परत दिल्या नसल्याचा ठपका ठेवत सहकार खात्याचे उपनिबंधक बसवराज मंटूर यांनी सोसायटी विरोधात 1 सप्टेंबर रोजी खडेबाजार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. गुन्हा दाखल झालेल्या दिवसापासून श्री पोलिसांना सापडत नव्हते. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच अप्पुगोळ यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. परंतु, न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. गेल्या एक आठवड्यापासून या प्रकरणाचा तपास खडेबाजार पोलिसांकडून शहर गुन्हे अन्वेषण विभागाकडे सुपूर्द केला आहे. सीसीबीचे पोलिस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱ्यांकडून तपास सुरू आहे. अप्पूगोळ यांना नुकतीच मुंबई येथून अटक केली. येथील जिल्हा न्यायालयात त्यांना हजर केले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :