लिंगायत व 'मराठा' मोर्चा काँग्रेस पुरस्कृत: भाजप खासदार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

गुजरातला पटेल, राजस्थानला गुज्जर, हरियानात जाट समाजाचे आंदोलन झाले. तसेच महाराष्ट्र येथे मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. या साऱ्या आंदोलनामागे काँग्रेस आहे. फोडा व राज्य करा, हे धोरण काँग्रेसचे आहे. तसाच प्रयत्न लिंगायत समाजबाबत सुरू आहे, असे वक्तव्य अंगडी यांनी केले.

बेळगाव : भाजपचे बेळगावचे खासदार सुरेश अंगडी यांची पुन्हा जीभ घसरली असून महाराष्ट्र व बेळगावात झालेला सकल मराठा क्रांती मोर्चा काँग्रेस पुरस्कृत होता, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे. 

खासदार अंगडी यांनी आज (ता 26) पत्रकार परिषद आयोजित केली होती. लिंगायत स्वतंत्र धर्म म्हणून घोषित केला जावा, या मागणीसाठी आयोजित मोर्चा काँग्रेस पुरस्कृत असल्याचे म्हटले आहे. त्यावरून त्यांच्यावर टीका केली जात आहे.  त्या वक्त्याव्यावर ठाम असल्याचे सांगून मोर्चा काँग्रेस पुरस्कृत होता, असा पुनरुच्चार केल. 

गुजरातला पटेल, राजस्थानला गुज्जर, हरियानात जाट समाजाचे आंदोलन झाले. तसेच महाराष्ट्र येथे मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. या साऱ्या आंदोलनामागे काँग्रेस आहे. फोडा व राज्य करा, हे धोरण काँग्रेसचे आहे. तसाच प्रयत्न लिंगायत समाजबाबत सुरू आहे, असे वक्तव्य अंगडी यांनी केले.

लिंगायत समाजाच्या आंदोलनाशी मराठा समाजाच्या आंदोलनाशी तुलना करण्याची गरज नव्हती. पण, केवळ मराठी भाषिकांना डिवचण्यासाठी अंगडी यांनी वक्तव्य केल्याचे मानले जाते. कोणत्याही पक्षाचे पाठबळ नाही, व्यासपीठ नाही वा कोणी नेता नाही, निव्वळ आम मराठा आणि बेळगावात मराठा आणि मराठी भाषकांच्या पाठबळावर यशस्वी ठरलेल्या लढ्याला राजकीय रंग अंगडी यांनी देण्याचा प्रयत्न केल्यामुळे मराठी भाषिकांत संताप व्यक्त होत आहे.

पश्चिम महाराष्ट्र

साडेपाच लाखाला कंपनीला ठेकेदारानेच घातला गंडा, गुन्हा दाखल श्रीगोंदे (नगर): महावितरणच्या बेलवंडी उपविभागातील गावातील वाणिज्य व...

07.03 PM

हुपरी ( जि. कोल्हापूर) : हुपरी परिसरात मागिल आठवड्यात विजेच्या कडकडाटांसह कोसळलेल्या जोरदार पावसानंतर गेले तीन - चार दिवस पावसाची...

02.00 PM

अकोले : मुळा, प्रवरा, आढळा पाणलोट क्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी होत असून, भंडारदरा जलाशय पुन्हा एकदा म्हणजे तिसऱ्यांदा भरून वाहू...

01.24 PM