बेळगावात बसखाली सापडून सायकलस्वार ठार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

बेळगाव -  बसखाली सापडून सायकलस्वार जागीच ठार झाले. ही घटना आज सायंकाळी चारच्या सुमारास गोवा वेस सर्कलमध्ये घडली.

बेळगाव -  बसखाली सापडून सायकलस्वार जागीच ठार झाले. ही घटना आज सायंकाळी चारच्या सुमारास गोवा वेस सर्कलमध्ये घडली. गोपाळ लक्ष्मण पाटील ( वय 55 रहाणार कोरे गल्ली शहापूर) असे मृताचे नाव आहे.

येळ्ळूर-बेळगाव ही बस  येळ्ळूरहून बेळगावला परतत होती. गोवा वेस सर्कलला बस आली तेव्हा सायकलस्वार गोपाळ पाटील आरपीडीकडून शहापूरला निघाले होते. बसचालकाला सायकलस्वाराचा अंदाज न आल्याने बसची सायकलीला जोराची धडक बसली, शिवाय सायकलस्वाराच्या डोक्यावरून बसचे चाक गेल्याने ते जागीच ठार झाले.  

श्री पाटील हे प्लंबर म्हणून काम करत होते. घटनेची माहिती मिळताच वाहतूक दक्षिण विभागाचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयाकडे पाठविला. बस चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेची वाहतूक दक्षिण विभाग पोलिसात नोंद झाली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी करीत आहेत.