बेळगावः कणबर्गी तलावात बुडून अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

बेळगाव: बेळगाव-गोकाक मार्गावरील कणबर्गी तलावात बुडून अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना आज (गुरुवार) सकाळी उघडकीस आली. सदर व्यक्तीचे वय अंदाजे 50 ते 55 वर्षे असून, त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही.

बेळगाव: बेळगाव-गोकाक मार्गावरील कणबर्गी तलावात बुडून अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना आज (गुरुवार) सकाळी उघडकीस आली. सदर व्यक्तीचे वय अंदाजे 50 ते 55 वर्षे असून, त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही.

सकाळी येथून कामावर निघालेल्या एकाने तलावात मृतदेह तरगत असल्याचे पाहिले. त्यांनी ही माहिती गावातील लोकांना दिली. नगरसेवक भैरेगौडा पाटील यांनी माळमारुती पोलिसांना फोन करून याबाबत सांगितले. घटनेची माहिती मिळताच माळमारुती पोलिस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक देसाई हे सहका-यांसह घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह बाहेर काढला. सदर व्यक्ती दोन दिवसांपूर्वी या तलावात पडली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. सदर व्यक्ती गावातील आहे की परगावची याबाबत अद्याप खात्री पटलेली नाही. तलावाजवळ पाय धुण्यासाठी गेले असता ते पडले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

तलावाच्या काठावर एक मळकी चादर व जर्मनी थाळी मिळाली असून,  सदर व्यक्ती भिक्षुक असल्याचा संशयही पोलिसांनी व्यक्त केला आहे. माळमारुती पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :