चार मुलांना वाचवण्यास गेलेल्या महिलेलाही जीवदान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

मलिकवाड - नदीत हातपाय धुण्यास जाऊन चार मुले पाय घसरून नदीत पडली. या वेळी तेथेच असलेल्या एका महिलेने धाडसाने त्या मुलांना वाचवण्यास पुढे गेली, पण चारही मुलांनी त्या महिलेला पकडून धरल्याने तिचाही जीव धोक्‍यात आला. इतक्‍यात नदीकाठावर असलेल्या गावातील नागरिकांनी नदीत उडी घेऊन सर्वांना जीवदान दिले. सोमवारी दुपारी १२.३० वाजता मलिकवाड येथील दूधगंगा नदीत ही घटना घडली. केवळ दैव बलवत्तर म्हणून पाच जणांची जलसमाधी वाचली.

राणी परशुराम कोळी (वय १३) दर्शन परशुराम कोळी (वय ९), प्रतीक्षा विजय माने (वय १०), दीक्षा विजय माने (वय ९) अशी चार मुलांची तर त्यांना वाचवण्यास जाऊन बुडणाऱ्या महिलेचे नाव नूरजान मोहसीन अपराज असे आहे. 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, गांधी जयंतीनिमित्त सुटी असल्याने येथील दूधगंगा नदीकाठावरील मल्लिकार्जुन व मसोबा देवालयात दर्शनासाठी गेलेली चार मुले हात पाय धुण्यास नदीकाठावर गेली. या वेळी त्यापैकी एकाचा पाय घसरुन नदीच्या पात्रात ओढले गेले. त्यांला वाचविण्यास असे एकेक अन्य तीन मुलेही गेली. पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने चारही मुले गटांगळ्या खाऊ लागली. हे पाहून धुणे धुण्यास गेलेली नुरजहा ही महिला मुलांना वाचवण्यास पुढे गेली. मुलांनी महिलेला पकडल्याने तिचाही जीव धोक्‍यात आला.

नूरजहाचा पती मोहसीन यांनी कपडे टाकून त्यांना वाचविण्याच्या प्रयत्न केला, पण त्यांच्यापर्यंत कापड पोचू शकत नव्हते.  या वेळी नदीपासून काही अंतरावर असलेल्या संजय इंगळे, ग्रामपंचायत सदस्य अविनाश खोत, ग्रामसहायक महादेव गजबर, तातोबा खोत यांनी नदीत उडी घेऊन महिलेसह दोघांना पाण्यातून सुखरूप बाहेर काढले. बचावकार्यासाठी उशीर झाला होता. त्यामुळे तीन मुली नदीत दिसेनाशा झाल्या होत्या. अखेरच्या क्षणी त्यांचे डोके दिसताच त्यांनाही नागरिकांनी ओढून बाहेर काढले. दोन ते तीन मिनिटाचा वेळ जरी झाला असता तरी पाचजणांना जलसमाधी मिळाली असती, अशी माहिती बचावकार्यात भाग घेतलेल्या धाडसी गावातीलच नागरिकांनी दिली. आपले प्राण धोक्‍यात घालून मुलांना वाचविण्यासाठी नदीत उडी घेतलेल्या नूरजाह व त्या सर्वांना वाचविणाऱ्यांचे मलिकवाड येथील नागरीकांतून कौतुक होत आहे.