बेळगावः मामाचा तीन वर्षाच्या बालिकेवर बलात्कार करून खून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

रायबाग तालुक्यातील घटना : घटनेनंतर मृतदेह पुरला शेतात

बेळगाव : तीन वर्षाच्या बालिकेवर बलात्कार करून तिचा निर्घृण खून केल्याची घटना आज (शुक्रवार) सकाळी हारूगेरी (तालुका रायबाग) येथे उघडकीस आली. उदाप्पा गाणगेर (35, कुरुबगड्डी, ता. रायबाग) असे संशयिताचे नाव असून, तो या बालिकेचा चुलत मामा असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. गेल्या पंधरा दिवसांतील बालिकेवर बलात्कार झाल्याची ही दुसरी घटना आहे. व्हन्नूर (तालुका बैलहोंगल) येथे अडीच वर्षाच्या बालिकेवर गावातीलच एका तरुणाने बलात्कार केल्याचे उघडकीस आले होते.

रायबाग तालुक्यातील हारूगेरीजवळील कुरुबगड्डी येथे गुरुवारी (ता. 21) मद्यप्राशन करून आलेल्या चुलत मामाने घरासमोर खेळणाऱ्या तीन वर्षाच्या भाचीला बोलावून घेतले. चॉकलेटचे आमिष दाखवून तिला बाजूच्या शेतात नेले. या ठिकाणी तिच्यावर बलात्कार करून तिचा निर्घृण खून केला. त्यानंतर मृतदेह अर्धवट स्थितीत शेतात पुरला. दोन तास झाले तरी बालिका सापडत नसल्याने घरच्यांनी शोधाशोध केली सुरू केली. सदर बालिकेच्या आजीने मामाबरोबर मुलीला जाताना पाहिले होते. त्यामुळे तिला कुठे सोडून आलास, अशी विचारणा केली. परंतु, उद्दापा काहीच बोलत नव्हता. पुन:पुन्हा विचारूनही तो काहीच बोलत नाही, हे लक्षात येताच कुटुंबियांनी पुन्हा शोधाशोध केली. शिवाय उद्दाप्पाचे कपडे चिखलाने माखलेले आढळले. त्यामुळे संशयावरून कुटुंबाने शेतात जाऊन शोध घेतला. यावेळी एके ठिकाणी अर्धवट स्थितीत पुरलेला मुलीचा मृतदेह आढळून आला. घरच्यांनी व ग्रामस्थांनी ही माहिती रायबाग पोलिस ठाण्याला दिली. रायबाग पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर उद्दाप्पावर रायबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

जिल्हा रुग्णालयासमोर गर्दी
संबंधित आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात आणले. पुन्हा एका नराधमाने बालिकेवर बलात्कार केल्याचे वृत्त बेळगावात पसरले. विविध हिंदुत्ववादी संघटनांसह काही महिला संघटना ही जिल्हा रुग्णालयासमोर दाखल झाल्या. सदर आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करत त्यांनी रुग्णालयासमोरच ठिय्या धरला. घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त अमरनाथ रेड्डी सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी एपीएमसी, मार्केट, खडेबाजारसह अन्य ठाण्यांचे पोलिस निरीक्षकही सहकाऱ्यांसह दाखल होऊन या सर्वांना आवरले. सायंकाळपर्यंत जिल्हा रुग्णालयात तणावाची स्थिती होती.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: belgaum news three years old girl raped and murder