अक्कलकोट- श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ३१ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा उत्सवाचा शुभारंभ मोठ्या उत्साहाने मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. श्री स्वामी समर्थांच्या साक्षीने नंदादिप प्रज्वलीत करून सोलापूरच्या महापौर शोभाताई बनशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला.
पुणे विभागसह धर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख, सहाय्यक धर्मादाय आयुक्त राजेश परदेशी सोलापूर, डॉ. विजय कानेटकर, सोलापूर जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रदीपसिंह रजपूत यावेळी उपस्थित होते. पतंजली योगपीठाच्या सुधा अळ्ळीमोरे, अतिरिक्त जिल्हा न्यायाधिश रमा सावंत-वाघुले, वटवृक्ष देवस्थान अध्यक्ष महेश इंगळे, अॅड. नितीन हबीब या मान्यवरांचा सत्कार अन्नछञ मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजय भोसले यांच्या हस्ते श्री समर्थ प्रतिमा कृपावस्त्र देवून करण्यात आला.
उत्सव शुभारंभाचे पहिले पुष्प प्रख्यात गायक पंडित ह्रदयनाथ मंगेशकर, राधा मंगेशकर, विभावरी आपटे यांनी 'नक्षत्रांचे देणे' या सुमधुर गीतांच्या कार्यक्रमाने गुंफले. भावगीत भक्तीगीत आणि महाराष्ट्रगीताने श्रोते मंत्रमुग्ध झाले. या वेळी अन्नछत्र मंडळ कार्यकारी विश्वस्त अमोल भोसले उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शाम मोरे, खजिनदार रवी भंडारे, विश्वस्त संतोष भोसले, आप्पा हंचाटे, लक्ष्मण पाटील, भाऊ कापसे, अॅड. संतोष खोबरे, ओंकारेश्वर उटगे, अंबणप्पा भंगे प्राचार्य मठदेवरू फत्तेसिंह शिक्षण संस्था अध्यक्ष बाबासाहेब निंबाळकर, प्रा भीमराव साठे प्राचार्य सायबण्णा जाधव बाळासाहेब देसाई, अलकाताई भोसले, अर्पिता भोसले अनुया फूगे, सोनल क्षीरसागर, मिनल शहा, लता मोरे, सुनीता कुलकर्णी, बाळासाहेब घाटगे, रोहीत खोबरे, शुभांगी गांधी, माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे यांच्यासह हजारो भक्तजन उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अगोदर स्वामी सदन या नूतन इमारतीचे उद्घाटन महापौर शोभा बनशेट्टी आणि पतंजली योगपीठाच्या सुधा अळ्ळीमोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.