भूविकास बॅंकेची मुख्य इमारत विक्री प्रक्रिया राबवावी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मार्च 2017

कोल्हापूर - भूविकास बॅंकेची मुख्य कार्यालय इमारत विक्री प्रक्रिया त्वरित राबवावी, या  मागणीचे निवेदन बॅंकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांना दिले. निवेदनाची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठवण्यात आली आहे. 

कोल्हापूर - भूविकास बॅंकेची मुख्य कार्यालय इमारत विक्री प्रक्रिया त्वरित राबवावी, या  मागणीचे निवेदन बॅंकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांना दिले. निवेदनाची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठवण्यात आली आहे. 

निवेदनात म्हटले आहे, की बॅंकेच्या कोल्हापुरातील मुख्य कार्यालयाची इमारत विकून सेवानिवृत्त ज्येष्ठ कर्मचाऱ्यांची देणी ४५ दिवसांत द्यावीत, अशी चर्चा झाली होती. त्यादृष्टीने आजअखेर कोणतीच कार्यवाही झालेली नाही. हातकणंगले शाखेची इमारत विक्रीस नजराणा शुल्क भरण्याची अडचण आहे. या इमारतीच्या विक्रीतून संपूर्ण कर्मचाऱ्यांची देणी भागत नाहीत. मुख्य कार्यालयाच्या इमारतीची विक्री झाल्याशिवाय संपूर्ण कर्मचाऱ्यांची देणी भागणार नाहीत. इमारत विक्री प्रक्रियेसंबंधी कसलीही हालचाल नाही किंवा जिल्हा उपनिबंधक यांच्याकडूनही माहिती मिळत नाही. 

दिवसेंदिवस ज्येष्ठ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जीवनमानात हलाकीची स्थिती असून, बरेच कर्मचारी हृदयविकार, मधुमेह, प्रोस्टेट कॅन्सर, रक्तदाब आदी विकारांनी त्रस्त आहेत. इमारतीची तातडीने विक्री करून कर्मचाऱ्यांची देणी भागवावीत, अन्यथा पुणे येथील आपल्या कार्यालयासमोर कोणत्याही क्षणी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनात दिला आहे. आंदोलन काळात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या जीवितास बरेवाईट झाल्यास सहकारप्रमुख म्हणून आपली जबाबदारी असेल, असेही निवेदनात म्हटले आहे.

या वेळी रावसाहेब चौगुले, श्रीकांत कदम, नंदकुमार पाटील, भारत पाटील, बाबासाहेब गुरव आदी उपस्थित होते.

Web Title: bhuvikas bank main building sailing process