माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकीत मोठ्या संधी

Dr.-Sanjiv-Wagh
Dr.-Sanjiv-Wagh

कऱ्हाड - माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकीत मोठ्या संधी असून, त्या ओळखण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये असणे आवश्‍यक आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय, न्यायिक, आरोग्य आदी क्षेत्रांशी निगडित माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी हे एकमेव शाखा आहे, अशी माहिती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) विभागाचे प्रमुख डॉ. संजीव वाघ यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. 

डॉ. वाघ म्हणाले, ‘तांत्रिक माहिती नसणाऱ्या लोकांमुळे आयटीत संधीच नाही असा गैरसमज पसरत आहे. त्याउलट सर्वात उज्ज्वल संधी असणारी शाखा ही आयटी अभियांत्रिकीची आहे. आयटी अभियंता संपूर्ण जगाला ज्ञान पुरवण्याचे काम करतो. परदेशात प्रामुख्याने आयटीत झालेली प्रगती ही भारतीय आयटी अभियंत्याच्या जीवावरच झालेली आहे. अमेरिकेतील सिलीकॉन व्हॅलीत असणारे संशोधक आयटी अभियंते आहेत. त्यात भारतीयच अधिक आहेत. भारतीय अभियंते खूप कष्टाळू व कामाच्या तुलनेत परदेशात कमी मोबदल्यात उपलब्ध होतात. देशात आयटी अभियंत्याच्या ज्ञानाची कदर करण्यासाठी शासनाचे धोरण महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे देशातच संधी निर्माण झाल्यास आयटी अभियंते देशाबाहेर जाणार नाहीत.’’

भविष्यात आयटी क्षेत्र खूप ॲडव्हान्स असणार आहे. सध्या ओला, उबेर वाहने पुरविण्याचे काम करते. एकही कार नसणारी उबेर कंपनी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून देशभरात वाहन पुरवणारी मोठी कंपनी म्हणून नावारूपाला आली आहे. त्याचप्रमाणे जगात हॉटेल सेवा पुरवणारी कंपनी म्हणून काम करणारी एअर बीएमबी कंपनीच्या मालकीचे एकही हॉटेल नाही, तरीदेखील सॉफ्टवेअरद्वारे ही उलाढला होते ती आयटीमुळेच शक्‍य आहे. माणूस हा सध्या संगणकाशी स्पर्धा करत आहे. आयटीत खूप संधी आहे.

न्यायिक संस्थते आयबीएम वॅटसन सॉफ्टवेअर येत असून, एका क्षणात तुम्हाला तुमच्या खटल्याचा कायदा काय आहे. त्यात तुम्हाला काय करायचे ते सांगतो. त्यात केवळ दहा टक्के चुका असल्याचे समोर येत आहे. भविष्यात न्यायिक संस्थेत मिळणारे सल्ले सुपर स्पेशालिस्ट असतील. आरोग्य क्षेत्रातही आयटीत प्रगती केली आहे. सर्व पॅथॉलॉजीच्या तपासण्या सॉफ्टवेअर क्षणात करून देत आहे, असेही डॉ. वाघ यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com