भाजप नेते वाळू तस्करांच्या पाठीशी - विश्‍वजित कदम

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 मे 2017

कडेगाव - तालुक्‍यात अनेक वाळूमाफिया निर्माण झाले आहेत. त्यांच्याकडून मोठ्याप्रमाणात वाळूची तस्करी सुरू आहे. अशा वाळू तस्करांना  पाठीशी घालण्याचे काम भाजपचे स्थानिक नेतृत्व करीत आहे. तर प्रशासन राजकीय दबावाखाली कुठलीही ठोस कारवाई करीत नाही. प्रशासनाने तालुक्‍यातील जनतेचे संरक्षण केले पाहिजे. वाळू तस्करांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्‍वजित कदम यांनी पत्रकार बैठकीत केले.

विश्‍वजित कदम म्हणाले, ‘‘वाळू ठेकेदारांकडून येथील सर्वसामान्य जनतेला मोठ्याप्रमाणात त्रास होत आहे. दररोज मोठ्याप्रमाणात बिनदिक्कतपणे नदीपात्रातून वाळू तस्करी सुरू आहे. तर वाळू तस्करीमुळे वांगी आणि वडियेरायबाग येथे दोन निरपराधांचा बळी गेला आहे. तरीही प्रशासन काहीही ठोस कार्यवाही करीत नाही. अजून किती जणांचा बळी जायचा ते वाट पाहत आहेत? अशा रीतीने तालुक्‍यातील कायदा व सुव्यवस्था आज बिघडत चालली आहे. तालुक्‍यातील बेकायदा वाळू तस्करी रोखण्याबाबत सर्वसामान्य जनतेने अनेकवेळा आवाज उठविला; मात्र महसूल अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. 

सततचा दुष्काळ, नापीक व शेतमालाला योग्य दर मिळत नसल्यामुळे राज्यातील शेतकरी आज मोठ्याप्रमाणात आत्महत्या करीत आहेत. अशा रीतीने शेतकरी अनेक संकटांनी ग्रासलेला असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जे वक्तव्य केले. 

भाजप सरकारला शेतकऱ्यांची कसलीही काळजी नाही. शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्याची त्यांची कसलीही भूमिका दिसत नसल्याचा त्यांनी आरोप केला.