सांगलीत भाजपचा दोन्ही कॉंग्रेसला दे धक्‍का

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

  • सांगली जिल्ह्यात पतंगराव कदम यांना मोठा धक्का
  • मंत्री सदाभाऊ खोत यांचे पुत्र पराभूत
  • खासदार संजय पाटील, शिवाजीराव नाईक यांना फटका

  • सांगली जिल्ह्यात पतंगराव कदम यांना मोठा धक्का
  • मंत्री सदाभाऊ खोत यांचे पुत्र पराभूत
  • खासदार संजय पाटील, शिवाजीराव नाईक यांना फटका

सांगली- कवठेमहांकाळ पंचायत समितीत राष्ट्रवादी-स्वाभीमानी आघाडी सत्तेत आली आहे. इथे विधानसभेवेळी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या अजितराव घोरपडे यांनी यावेळी मात्र राष्ट्रवादीसोबत आघाडी केली होती. आर.आर.पाटील यांच्या पत्नी आमदार सुमन पाटील आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी पंचायत समितीत सत्ता कायम राखली आहे. येथील जिल्हा परिषदेच्या चारही जागा या आघाडीने प्रत्येकी दोन जिंकल्या आहेत.

कवठेमहांकाळ : जिल्हा परिषद : ढालगाव-भगवान वाघमारे, कुची -आशाराणी पाटील (दोन्ही राष्ट्रवादी) , देशिंग -संगीता नलवडे, रांजणी-आशा पाटील (स्वाभीमानी विकास आघाडी) पंचायत समिती : ढालगाव - विकास हाक्के (भाजप),नागज-ज्योत्स्ना माळी (विकास आघाडी), एम.के.पाटील (राष्ट्रवादी), कोकळे- दिपक ओलेकर (राष्ट्रवादी) , देशिंग - मनोहर पाटील (राष्ट्रवादी), रांजणी -निलम पवार (राष्ट्रवादी), हिंगणगाव- सोनाली लोंढे (विकास आघाडी), मळणगाव-सरीता शिंदे (स्वाभीमानी आघाडी), ढालगाव गण वगळता तालुक्‍यात राष्ट्रवादी-विकास आघाडी (अजितराव घोरपडे) सर्वत्र विजयाच्या दिशेने.

खानापूर पंचायत समितीवर राष्ट्रवादीतून विधानसभेवेळी शिवसेनेत गेलेल्या आमदार अनिल बाबर यांनी तिकडे जाऊनही सत्ता कायम राखली आहे. त्यांचे पुत्र सुहास बाबर यांनी जिल्हा परिषद गटातून विजयी झाले आहेत. येथील जिल्हापरिषदेच्या 3 जागा शिवसेनेने जिंकून कॉंग्रेसचे माजी आमदार सदाभाऊ पाटील यांनी राष्ट्रवादीसोबत केलेल्या आघाडीचा पराभव केला आहे. पंचायत समितीतही सेनेने पाच जागा जिंकल्या. परिवर्तन आघाडीने एक जागा जिंकली.

वाळवा तालुक्‍यात मंत्री सदाभाऊ खोत यांचा सागर बागणी जिल्हा परिषद गटातून पराभूत झाला. रयत विकास आघाडीच्या झेंड्याखाली येथे राष्ट्रवादेचे नेते जयंत पाटील यांचे सर्व विरोधक एकत्र आले होते. जिल्ह्यातील 11 जिल्हा परिषद गटापैकी 7 जागांवर राष्ट्रवादीने विजय मिळवला. बागणीचीजागा राष्ट्रवादीच्या बंडखोराने जिंकली. येथे रयत आघाडीे 3 जागांवर समाधान मानावे लागले.

पलुस : कॉंग्रेस नेते पतंगराव कदम यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसला पराभवाचा धक्का बसला आहे. कुंडल गटातून राष्ट्रवादीचे शरद लाड यांनी पतंगरावांचे जावई महेंद्र लाड यांचा पराभव केला.

जत : तालुक्‍यात भाजपने जादरबोबलाद, संख, दरीबडची, बनाळी, शेगाव, बिळूर या गटात तर कॉंग्रेस उमदी, डफळापूर, मुंचंडी गटातून विजय मिळवला.उमदीतून विक्रम सावंत 1200 मतांनी विजय मिळवला, पंचायत समितीत अठरापैकी नऊ जागा जिंकून भाजप सत्तेजवळ पोहचला आहे. उर्वरित जागांवर कॉंग्रेस सात, जनसुराज्य शक्ती व वसंतदादा आघाडी प्रत्येकी एक असे बलाबल आहे.

शिराळा : कॉंग्रेसचे सत्यजीत देशमुख आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने विद्यमान आमदार शिवाजीराव नाईक यांच्या नेतृत्वाखालील भाजपचा सुपडासाफ केला आहे. वाकुर्डे पंचायत समितीची एकमेव जागा वगळता तालुक्‍यात कुठेही क

मिरज : जिल्हा परिषद विजयी : मालगाव,आरग, बेडग,कवलापूर, म्हैसाळ (सर्व भाजप), भोसे एरंडोली (सर्व कॉंग्रेस)
पंचायत समिती : खटाव, आरग, नरवाड, बेडग, गुंडेवाडी, मालगाव ( सर्व भाजप), सोनी,भोसे, सलगरे, बामनोली,कवलापूर, एरंडोली (सर्व कॉंग्रेस)

जिल्हा परिषदेचे एकूण गट 60
तालुकानिहाय चित्र जिल्हा परिषद गट
भाजप * कॉंग्रेस * राष्ट्रवादी * शिवसेना
तासगाव : 2 * * 4 *
कवठेमहांकाळ : 0 * * 4 *
मिरज : 5 * 2 * *
कडेगाव : 2 * * *
शिराळा 0 * 2 * 2 *
खानापूर 0 * 0 * 0 * 3
पलूस 2 * 0 * 1 *0
जत 6 * 3 * 0 *0
वाळवा 3 * 0 * 8
आटपाडी 4 *

एकूण
भाजप-24 अधिक विकास आघाडी
राष्ट्रवादी : 19
कॉंग्रेस : 7
शिवसेना : 3

Web Title: bjp overpowers congress, ncp in sangli