भाजपाने सत्तेवर आल्यापासून जनतेला खोटी आश्वासने दिली - अशोक पवार

pawar.
pawar.

लोणी काळभोर - भारतीय जनता पक्षाने सत्तेवर आल्यापासून जनतेला खोटी आश्वासने दिली आहेत. त्यामुळे नियोजनशून्य व फसव्या सरकारच्या धोरणांविरोधात आवाज उठविण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे मत माजी आमदार अशोक पवार यांनी कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे व्यक्त केले. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन व १० जून २०१८ रोजी पुणे येथे होणाऱ्या हल्लाबोल आंदोलनाच्या सांगता सभेनिमित्त पक्षातर्फे पूर्व हवेलीमध्ये गावभेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कुंजीरवाडी येथे झालेल्या बैठकीत पवार यांनी आपले मत मांडले. 

गावभेट दौऱ्यामध्ये पूर्व हवेलीतील कोलवडी, थेऊर, कुंजीरवाडी, नायगाव, पेठ, कोरेगाव मुळ, उरुळी कांचन, शिंदवणे, वळती या गावांमध्ये बैठका घेण्यात आल्या. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदिप कंद, राष्ट्रावादी कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष नंदू काळभोर, महिलाध्यक्षा लोचन शिवले, पंचायत समिती सदस्या कावेरी कुंजीर, सरपंच अनुराधा कुंजीर, माजी सरपंच सचिन तुपे, जिल्हा सरचिटणीस दिलीप वाल्हेकर, युवक उपाध्यक्ष संतोष कुंजीर, सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष राजेंद्र चौधरी, शिवदीप उंद्रे, पर्यावरण संरक्षण समितीचे अध्यक्ष संजय जगताप उपस्थित होते.

यावेळी अशोक पवार म्हणाले,"भारतीय जनता पक्षाच्या सरकारने सत्तेवर आल्यापासून शेतकरी, उद्योजक, कामगार व समाजातील सर्वच घटकांना केवळ आश्वासनांचे गाजर दाखवले आहे. शेतकऱ्यांच्या शेतमाला योग्य हमीभाव देण्यासाठी या सरकारने कुठलेच उपाय केल्याचे दिसून येत नाही, याउलट विविध योजनांच्या नावाखाली सामान्य माणसाच्या खिश्याला कात्री लावली आहे. या सरकारकडून विकासाच्या नावाखाली आश्वासनांचा भडिमार सुरु असून पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने मध्यम वर्गाची लुट चालवली आहे. शिरूर-हवेली तालुक्यातून प्रथम सरू केलेल्या शिरपूर पॅटर्न, दारिद्र रेषेखालील कुटुंबांना वैद्यकीय मदत, शुद्ध पाणीपुरवठा प्रकल्प अशा विविध योजनांना भाजपा सरकारने नाव बदलून स्वत:च्या नावाने पुढे चालविल्या आहेत."

यावेळी प्रदिप कंद म्हणाले, "समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राजकारण्यांनी एकत्र येवून प्रयत्न करणे गरजेचे आहे. सध्या भारतीय जनता पक्षाच्या कारभारावर समाजातील सर्व घटक नाराज आहेत, त्यामुळे सत्ता परिवर्तनासाठी मतदारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला सहकार्य करावे." 

पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वृक्षारोपण - 
दरम्यान, जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने कुंजीरवाडी येथील पर्यावरण संरक्षण समितीच्या वतीने माजी आमदार अशोक पवार व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदिप कंद यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com