करगणीत भाजप, शिवसेनेत काट्याची टक्कर 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

आटपाडी - सर्वसाधारण गटातील महिलेसाठी राखीव असलेल्या करगणी गटात भाजप-शिवसेना यांच्यात तुल्यबळ लढत मतदारांना पहायला मिळणार आहे. येथे कॉंग्रेस आणि रासप कशी लढत देऊन कोण-कोणाची मते घेणार, यावर निवडणुकीचा निकाल ठरणार आहे. 

आटपाडी - सर्वसाधारण गटातील महिलेसाठी राखीव असलेल्या करगणी गटात भाजप-शिवसेना यांच्यात तुल्यबळ लढत मतदारांना पहायला मिळणार आहे. येथे कॉंग्रेस आणि रासप कशी लढत देऊन कोण-कोणाची मते घेणार, यावर निवडणुकीचा निकाल ठरणार आहे. 

अर्ज माघारीनंतर करगणीत भाजप-सेना-कॉंग्रेस आणि रासपात चौरंगी लढत लागली आहे. गतवेळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या या गटात यावेळी उमेदवारही मिळाला नाही. राष्ट्रवादीचे अस्तित्वच संपले आहे. राजेंद्रअण्णांना भाजपात प्रवेश केल्यामुळे गटाची समीकरणे बदलीत. गतवेळी अमरसिंह देशमुख आणि गोपीचंद पडळकर यांच्यात तुल्यबळ लढत झाली होती. यावेळी दोघेही भाजपात एकत्र आल्यामुळे त्यांचे होसले बुलंद आहेत. त्यांना सेनेचे तानाजी पाटील यांनी विकास कामे आणि दोन महिने तयारी करून कडवे आवाहन दिले आहे. त्यात देशमुखांच्या प्रवेशामुळे नाराजी उमटली आहे. अनेकजण सेनेच्या गळाला लागलेत. त्यामुळे भाजपला लढत सोपी राहिलेली नाही. 

येथे भाजपने वंदना गायकवाड आणि जयश्री व्हनमाने यांना एबी फार्म दिला आहे. दोघांपैकी कोणाला अंतिम उमेदवारी देणार, याकडे लक्ष आहे. तर सेनेतून तानाजी पाटील यांच्या पत्नी माजी सभापती मनीषा पाटील आणि नीता गायकवाड यांना एबी फार्म दिला आहे. पाटील यांची चर्चा आहे. भाजप कोण उमेदवार देणार यावर सेनेचा उमेदवार ठरणार आहे. कॉंग्रेसची प्रियंका गायकवाडांची उमेदवारी आहे. 

शेटफळे गणात सेनेतून दत्तात्रय यमगर, भाजपचे दादासाहेब मरगळे, कॉंग्रेसचे रुक्‍मिणी यमगर आणि रासपातून सुखदेव म्हारगुडेची उमेदवारी निश्‍चित आहे तर करगणीत भाजपची तानाजी यमगर, रासपातून लक्ष्मण सरगर यांची आहे. सेनेतून दत्ता पाटील, उत्तम माने किंवा अण्णासाहेब पत्की गळाला लागल्यात त्यांची उमेदवारी राहणार आहे. सध्यातरी पत्कींनी अपक्ष लढण्याची तयारी चालवली आहे. 

कॉंग्रेस-रासपवर गटाचा निकाल 
रासपने उमेदवारी मागे घेतल्यास भाजपला तर कॉंग्रेसने घेतल्यास सेनेला फायदा होणार आहे. दोघेही लढल्यास कोण किती मते घेणार, यावर भाजप-सेनेचा गुलाल ठरणार आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून कॉंग्रेस-सेना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर : गेली काही वर्षे रेंगाळलेल्या पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे माजी महानगर...

03.21 PM

कऱ्हाड : शहरातील विविध ठिकाणचे अतिक्रमण हटवण्याची मोहिम पालिकेने हाती घेतली. पालिकेचे चार अधिकारी व पन्नास कर्मचारी त्यात सहभागी...

01.00 PM

श्रीगोंदे, (जिल्हा नगर) : क्रूरकर्मा नराधमाने पाच वर्षांचा कोवळ्या जीवाच्या शरीराची विटंबना केली. एकदा नव्हे अनेकदा तिच्यावर...

मंगळवार, 15 ऑगस्ट 2017