सोलापूर महापालिकेत चिठ्ठी ठरली भाजपची तारणहार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

विजयी उमेदवार :
1 स्थापत्य समिती : विनोद भोसले (कॉंग्रेस)
2  शहर सुधारणा समिती : गणेश वानकर (शिवसेना)
3 वैद्यकीय सहाय समिती : संतोष भोसले (भाजप )
4 मंड्या व उद्यान समिती : सुनीता रोटे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
5 विधी समिती : गणेश पुजारी (बसप)
6 कामगार व समाजकल्याण समिती : वत्सला बरगंडे (शिवसेना)
7 महिला व बाल कल्याण समिती : अश्विनी चव्हाण (भाजप )

सोलापूर - महापालिका विशेष समिती सभापती निवडणुकीत विरोधी पक्षाचे पाच उमेदवार विजयी झाले, तर भाजपचे दोन उमेदवार चिठ्ठीद्वारे विजयी झाले.

भाजपला पराभुत करण्यासाठी महापालिकेतील शिवसेना, एमआयएम, कॉंग्रेस, राष्ट्रवादी व बसप या पक्षांनी महाआघाडी केली होती. त्यामुळे या समित्यामध्ये भाजप 4 व महा आघाडी 5 असे पक्षीय बलाबल झाले होते. त्यामुळे सर्व सात समित्यामध्ये भाजप उमेदवाराचा पराभव निश्चित होता. मात्र राष्ट्रवादीचे दोन समित्यातील सदस्य गैरहजर राहिले. त्यामुळे महिला व बालकल्याण आणी वैद्यकीय समितीत समान पक्षीय बलाबल झाले.

या ठिकाणी चिठ्ठी काढल्यावर तो कौल भाजप उमेदवारांच्या बाजूने गेला. त्यामुळे अंतर्गत भांडणाने झालेली भाजपची नामुष्की चिठ्ठीने तारली अशी चर्चा सुरु झाली.

विजयी उमेदवार :
1 स्थापत्य समिती : विनोद भोसले (कॉंग्रेस)
2  शहर सुधारणा समिती : गणेश वानकर (शिवसेना)
3 वैद्यकीय सहाय समिती : संतोष भोसले (भाजप )
4 मंड्या व उद्यान समिती : सुनीता रोटे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
5 विधी समिती : गणेश पुजारी (बसप)
6 कामगार व समाजकल्याण समिती : वत्सला बरगंडे (शिवसेना)
7 महिला व बाल कल्याण समिती : अश्विनी चव्हाण (भाजप )

Web Title: BJP in Solapur Municipal Corporation