भाजप सत्तेत येणार नाही ही काळ्या दगडावरची रेष : पृथ्वीराज चव्हाण

The BJP will not be in power surely says Prithviraj chauhan
The BJP will not be in power surely says Prithviraj chauhan

कऱ्हाड - भाजप विरोधात देशात वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या विरोधात समविचारी लोकांची आघाडी निर्माण होते आहे. त्यामुळे आगामी काळात देशात व राज्यात भाजप सत्तेवर येणार नाही, ही काळ्या दगडावरची रेष आहे, असे मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. वास्तविक पारदर्शी निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी निवडणुक आयोगाची आहे. मात्र तेच भाजपचे घरगडी असल्यासारखे वागत आहेत, अशीही टिका यावेळी श्री. चव्हाण यांनी केली. श्री. चव्हाण यांनी आज दुपारी पत्रकारांशी संवाद साधला. 

श्री. चव्हाण म्हणाले, नोटाबंदींचा विपरीत परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. तेच अहवाल देत आहेत. भाजप देशातील लोकशाही संस्था मोडायला निघाले आहेत. त्यामुळे त्यांना थांबवण्यासाठी कॉग्रेससह समविचारी पक्ष एकत्रीत येवून गटबांधणी करत आहेत. अनेक लोकांची साथ मिलत आहे. या गटात कोणी नेता नसणार मात्र भाजप थांबवणे व लोकशाही वाचवणे हाच एक अजेंडा अशणार आहे. भाजपमधील अनेकांनी नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आऴज उठवला आहे. त्यात यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा, अरूण शौरी यांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्यांचा त्यात समावेश आहे. लोकांना आता एकधिकारसाही दिसते आहे. त्यांचे वाढते स्तोम देशाला मारक आहे. राज्यातही वेगळी स्थिती नाही. साम, दाम, दंड, भेदाची भाषा केली जात आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत भाजप देशातच नव्हे तर राज्यातही उरणार नाही. विकासाच्या मुद्यावर, लोकांना अश्वासन देवून भुलवण्याच्या मुद्दावर व भुलाथापा मारून निवडणुकां जिंकण्याचे दिवस आता संपले आहेत. त्यामुळे भाजपकडून वेगळे तंत्र वापरले जाणार आहे. तोडफोडीच्या राजकारण करून भाजप आता निवडणुका लढवणार आहेत. त्यामुळे कोणीही कोणत्याही मंत्र्याच्या विरोधात भष्ट्राचाराचा आरोप केला की, त्याला क्लीन चीट दिली जात आहे. राज्यात अनेक घटना अशा आहेत. जेथे मुख्यमंत्र्यांनीच स्वतः सगळ्यांना क्लीन चीट दिल्याचे दिसते आहे. 

ते म्हणाले, बुलेट ट्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार झाला आहे. विमान खरेदीत घोटाळा आहे. त्यांच्या पक्षातील मंत्र्यांना विस्वासात न गेता व्यवहार केले जात आहे. बुलेट ट्रेनचा आम्हाला काहीह उपयोग नाही. आमच्या जमीनी गेवू नये, अशी मागमी पालघरमधील लोक करताहेत मात्र तेथे जबरदस्तीने संपादनाची प्रक्रीया सुरू आहे. साऱ्यावरून भाजपचा कारभार अतीशय वाईट अशल्याचेच दिसते आहे. बुलेट ट्रेनचा लाख कोटी १० लाख आसपास आहे. त्यात पारदर्शीपणा नाही. ओरडून लोक विचारताहेत कोणीही स्पष्टीकरण देण्यास तयार नाही. ती रक्कम कशी ठरली. त्याचा निविदा कोठे निघाली. असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. त्यावर काहीही हालचाल नाही. देशात भष्ट्राचाराच्या भाजप सध्या बॅकपूट आहे. त्यामुळे सार दाबून पुढ न्यायच चालू आहे. पारदर्शकता दाबून भष्ट्राचाराला बळ दिले जात आहे. माहितीच्या अधिकाराखाली कोणतीही माहिती मागितली तरी त्याची माहिती मिळत हेच दुर्देव आहे.

...त्यांना अधिकार काय 
कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदार संघात दोन राज्यमंत्री दर्जाची पद भाजप देवून तुम्हाला फाईट दिली आहे, या प्रश्नावर श्री. चव्हाण म्हणाले, राज्यमंत्री पदाचा दर्जाला काय अधिकारच नसतो. ज्यांना अधिकार नाही, अशी पदे वाटून तरी काय उपयोग. आम्हालाही त्याचा काहीही फर पडत नाही. अशी अजून दोनचार पदे दिली तरी आम्हाला काहीही वाटायचे कारण नाही. मलकापूरची निवडणुकीबीबत श्री. चव्हाण म्हणाले. मलाकपूरच्या निवडणुकीबाबत समविचारी लोकाशी चर्चा सुरू आङे. जे सोबत येतील त्यांच्याशी बोलण करून पुडील निर्णय घेवू. मलकापूरची निवडणुक ही विकासावरच होईल. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com