सांगलीच्या महापौरपदी भाजपच्या संगीता खोत, तर उपमहापौरपदी सुर्यवंशी

BJPs Sangita Khot new mayor of Sangli
BJPs Sangita Khot new mayor of Sangli

सांगली- महापालिकेतील तेराव्या आणि भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या महापौरपदी संगीता खोत यांची तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड झाली. त्यांना 78 सदस्यीय सभागृहातील भाजपच्या 41 आणि अपक्ष गजानन मगदूम यांनी मत दिले. महापालिकेत कॉंग्रेसचे 20 तर राष्ट्रवादीचे 15 सदस्य असून अपक्ष विजय घाडगे यांनी मतदानात भाग घेतला नाही.

या निवडीत दोन्ही कॉंग्रेसने आपले संख्याबळ कायम ठेवण्यात यश मिळवले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया शांततेत पार पडली. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपने शुन्यावरून थेट सत्तेपर्यंत मजल मारताना 41 सदस्यांचे बहुमत प्राप्त केले आहे. महापौरपदासाठी ओबीसी महिला आरक्षण अडीच वर्षांसाठी आहे. भाजपकडून संगीता खोत, सविता मदने यांनी अर्ज दाखल केले होते. मदने यांनी आज सकाळी अर्ज मागे घेतला. त्यानंतर झालेल्या निवड प्रक्रियेत खोत यांना 42 तर कॉंग्रेसच्या महापौरपदाच्या उमेदवार वर्षा निंबाळकर यांना 35 मते मिळाली. त्यानंतर झालेल्या उपमहापौरपदाच्या निवडीत धीरज सूर्यवंशी यांची निवड झाली. 

दरम्यान, सभेच्या प्रारंभी महापौर निवडीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपच्या 42 नगरसेवकांपैकी तीन चार जणांचा अपवाद वगळता गोव्याला गेलेल्या नगरसेवकांचा कॉंग्रेस राष्ट्रवादीने निषेध नोंदवला. भाजपचे संस्थापक अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाले असताना मौजमजा करायला नगरसेवक गेले. हा लोकशाही प्रक्रियेचा अवमान आहे असा दावा करीत कॉंग्रेसजनांनी निषेध नोंदवला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com