ब्रिटिशकालीन पुलांचे 15 दिवसांत स्ट्रक्‍चरल ऑडिट - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 ऑगस्ट 2016

कोल्हापूर - जिल्ह्यातही ब्रिटिशकालीन पुलांचे येत्या 15 दिवसांत स्ट्रक्‍चरल ऑडिट करून आवश्‍यक त्या उपाययोजना केल्या जातील. भविष्यात महाडसारखी दुर्घटना घडणार नाही, यासाठी आवश्‍यक खबरदारी आणि उपाययोजना करण्यास शासनाकडून प्राधान्य दिले जाईल, असे आश्‍वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमात ते बोलत होते.
 

कोल्हापूर - जिल्ह्यातही ब्रिटिशकालीन पुलांचे येत्या 15 दिवसांत स्ट्रक्‍चरल ऑडिट करून आवश्‍यक त्या उपाययोजना केल्या जातील. भविष्यात महाडसारखी दुर्घटना घडणार नाही, यासाठी आवश्‍यक खबरदारी आणि उपाययोजना करण्यास शासनाकडून प्राधान्य दिले जाईल, असे आश्‍वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमात ते बोलत होते.
 

ते म्हणाले, ‘महाड दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्यास सुरवात केली आहे. जुन्या पुलांबाबत योग्य तो निर्णय घेता यावा, यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांची तसेच अभियंत्यांची कार्यशाळा घेऊन त्यातून याबाबतच्या उपाययोजना घेतल्या जातील. त्यामुळे जिल्ह्यातील पुलांचे ऑडिट करून उपाययोजना करण्यात येतील.‘‘
 

ते म्हणाले, ‘जिल्ह्यात तीर्थक्षेत्र विकास आणि पर्यटनाला शासनाने अधिक गती दिली आहे. महालक्ष्मी तीर्थक्षेत्र आराखडा तयार असून पहिल्या टप्प्यासाठी 72 कोटीस मान्यता मिळली आहे. जोतिबा मंदिर परिसर विकासाचा आराखडा तयार असून पहिल्या टप्प्यात 25 कोटींचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे. ऐतिहासिक माणगाव येथे स्मारकासाठी 5 कोटींचा विकास आराखडा तयार केला आहे. कन्यागत महापर्वकाल सोहळा श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे उत्साही आणि भक्तिमय वातावरणात साजरा झाला. वर्षभर चालणाऱ्या सोहळ्यामुळे श्रद्धा, भक्ती आणि पर्यटनाची संधी जनतेला मिळणार आहे. कन्यागत सोहळ्यासाठी शासनाने 121 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

महसूल कायद्यात बदल करणार
महसूल कायद्यामध्ये गरजेनुसार बदल करण्याची कार्यवाही करण्यास शासनाने प्राधान्य दिले आहे. या क्षेत्रातील जुन्या कायद्यांचा अभ्यास आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले जाईल. पड जमीन मालकांना परत करण्याचा क्रांतिकारी निर्णय शासनाने नुकताच घेतला आहे. यापुढील काळात वतन जमिनी एकदा नजराणा घेऊन नावावर केल्यास पुन्हा विकताना महसूल विभागाच्या परवानगीची गरज भासणार नाही. याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. राज्यात सात-बारावर पुरुषांबरोबर महिलेचे नाव लावण्याचे विशेष अभियान महसूल विभागामार्फत हाती घेतले जाईल, अशी घोषणा श्री. पाटील यांनी केली.

पालकमंत्री पाटील म्हणाले
- प्रधानमंत्री जीवन सुरक्षा योजनेत जिल्ह्यात 6 लाख 51 हजार 720 खाती
- पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेत 3 लाख 47 हजार 189 खाती
- या दोन्ही योजनांतून जिल्ह्यातील 200 लाभार्थ्यांच्या वारसांना मृत्युपश्‍चात 4 कोटी रुपये दिले
- अटल पेन्शन योजनेची 1250 खाती
- जिल्हा वार्षिक योजनेत सर्वसाधारण योजनेसाठी 226 कोटी 50 लाख
- अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 100 कोटी 81 लाख
- ओटीएसपीसाठी 1 कोटी 80 लाख
- नावीन्यपूर्ण योजनेसाठी 8 कोटी
- जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात 69 गावांमधून 28 कोटी 57 लाख रुपये खर्च
- जलयुक्तच्या कामातून 4 हजार 466 टीएमसी पाणीसाठा होऊन 8 हजार 994 हेक्‍टर क्षेत्रासाठी एकसंरक्षित सिंचन
- जलयुक्तसाठी यंदा 20 गावांची निवड करून 32 कोटी 22 लाखांचा आराखडा तयार करून 622 कामांना सुरवात
- जिल्ह्यात 8 लाख वृक्षलागवड
- जिल्ह्यात 2 ऑक्‍टोबर ते 19 नोव्हेंबर 2016 या कालावधीत नवीन स्वरूपातील संत गाडगेबाबा अभियान राबवणार