रोज १४९ रुपयांत चार जीबी डाटा!

रोज १४९ रुपयांत चार जीबी डाटा!

सातारा - रशियाची राजधानी मॉस्को येथे फिफा वर्ल्डकपला गुरुवारपासून प्रारंभ झाला. भारतामधील फुटबॉलप्रेमींचा जल्लोष आणि त्यांच्या सळसळत्या उत्साहात भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) भर घातली आहे.

फिफा वर्ल्ड कप एसटीव्ही डाटा स्पेशल रुपये १४९ हे व्हॉऊचर बाजारात आणले आहे. या अंतर्गत ग्राहकास दररोज चार जीबी इंटरनेट डाटा देण्यात येत आहे. 

युवा पिढीत फुटबॉल या खेळाचे मोठे आकर्षण आहे. देशातील युवा वर्गास मोबाईलवरच फिफा वर्ल्डकपचे सामने लाईव्ह पाहता यावेत, यासाठी बीएसएनएलने रुपये १४९ किमतीचे व्हॉऊचर बाजारात आणले आहे. या अंतर्गत ग्राहकास दररोज चार जीबी इंटरनेट डाटा प्राप्त होत आहे. हे व्हॉउचर्स १५ जुलैपर्यंत बाजारात विक्रीस उपलब्ध आहेत. त्याची वैधता २८ दिवसांसाठी आहे. खासगी दूरसंचार कंपन्या तीन जीबी, तसेच दोन जीबी इंटरनेट डाटासह व्हॉईस कॉलिंग व एसएमएस सुविधा देत असल्या, तरी बीएसएनएलच्या फिफा वर्ल्डकप योजनेस मोठा प्रतिसाद मिळेल, असा दावा बीएसएनएलकडून व्यक्त केला जात आहे. याबरोबरच सण उत्सव काळात बीएसएनएल त्यांच्या ग्राहकांना नेहमीच भेट देत आले आहे.

यंदा ही ईद- उल -फितर निमित्त ‘ईद मुबारक’ ७८६ रुपयांचे कॉम्बो व्हॉऊचर बाजारात उपलब्ध करण्यात आले आहे. यामध्ये १५० दिवसांसाठी अमर्याद व्हॉईस कॉलिंग (दिल्ली व मुंबईसह), तसेच दररोज दोन जीबी इंटरनेट डाटा, १०० एसएमएस ग्राहकांना मिळत आहे. एकूण ३०० जीबी इंटरनेट डाटा, १५ हजार एसएमएसचा लाभ होत आहे.

#BSNLFIFA२०१८ प्रश्‍नावली स्पर्धा
फिफा वर्ल्ड कप स्पर्धेची रंगत दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. या स्पर्धा कालावधीत बीएसएनएलने सोशल मीडियावरील फेसबुक पेज BSNL India व ट्‌विटर @BSNLCorporate  येथे एक अभिनव स्पर्धा सुरू केली आहे. बीएसएनएलच्या माध्यमातून प्रश्‍न विचारले जाणार असून, फुटबॉलप्रेमींनी त्याचे उत्तर देणे अपेक्षित आहे. अधिक माहितीसाठी फेसबुकवर #BSNLFIFA२०१८ टाईप करून क्‍लिक करावे, असे आवाहन बीएसएनएलद्वारे करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com