घरे खड्ड्यात... रस्ते, गटारे उंचावर!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 जुलै 2017

बुध - बुधमधील अंतर्गत रस्ते, गटारे उंचावर व घरे उतारावर खड्ड्यात असल्याने सांडपाणी व्यवस्थापनाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. संपूर्ण गावाचा सर्व्हे करून आवश्‍यक तेथे नव्याने गटारबांधणी करण्याची गरज आहे.

खटाव तालुक्‍यातील सर्वांत जुनी व मोठी बाजारपेठ म्हणून बुध गावाची ओळख आहे. गावाला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला असून येथील राजेघाटगे घराण्याच्या पराक्रमाची साक्ष देणारा भग्नावस्थेतील राजवाडा गावाच्या मध्यवर्ती भागात आजही तग धरून उभा आहे. 

राजेघाटगे यांच्या संस्थान काळात राजवाड्याच्या दक्षिण दिशेला जुन्या धाटणीचे पठाडेवाडा, पतकेवाडा, महामुलकरवाडा, जागतिक कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ (कै.) डॉ. पा. वा. सुखात्मे यांचा वाडा, देसाईवाडा असे अनेक ऐतिहासिक वाडे आहेत. या वाड्यांतील सांडपाणी व्यवस्था अत्यंत उच्च दर्जाची होती. मात्र, काळाच्या ओघात वाड्यांची पडझड झाली. त्यांच्या वारसांनी त्याच ठिकाणी नवीन घरे बांधली, तर काहींनी डागडुजी करून आजही वाडे वापरात ठेवले आहेत. 

त्यानंतरच्या काळात गावातील अंतर्गत रस्त्यावर अनेक वेळा खडीकरण व डांबरीकरण झाल्यामुळे राजवाड्याच्या दक्षिण बाजूच्या पठाडेवाडा, अनगळ आळी, विठ्ठल मंदिर ते सोमनाथ आळीपर्यंतच्या रस्त्याची व गटारांची उंची वाढत गेली. परिणामी गटारे उंचावर व घरे, वाडे उतारावर खड्ड्यात अशी विचित्र स्थिती निर्माण झाली. 

या विभागातील शंभरहून अधिक घरांतील पाणी गटारात जात नसल्याने ग्रामस्थांपुढे सांडपाणी व्यवस्थापनाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. पावसाळ्यात घरांपुढे पाण्याची डबकी तयार होतात. अनेकदा गटाराचे पाणी रस्त्यालगतच्या घरांमध्ये शिरण्याचे प्रकार घडतात. दत्त मंदिर ते भोईवाडा या दरम्यान गटार व्यवस्थाच नसल्याने पावसाळ्यात या विभागातही घाणीचे साम्राज्य असते.

टॅग्स