"एलसीबी' कडून घरफोडी करणारी टोळी जेरबंद 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

सांगली - "एलसीबी' च्या पोलिस पथकाने जुना बुधगाव रस्त्यावरील वाल्मिकी-आंबेडकर आवास घरकुल परिसरात छापे टाकून दोघा चोरट्यांना अटक केली. तर तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीचे साहित्य, रॅम्बो सुरा, कोयता, तीन दुचाकी असा 2 लाख 6 हजार 674 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अटकेतील जावेद नूरमहंमद गवंडी (वय 35), सोहेल जावेद शेख (वय 19) आणि तीन साथीदारांकडून घरफोडीचे सात गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. 

सांगली शहर आणि उपनगरातील घरफोडी व चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अप्पर अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी एलसीबी चे निरीक्षक बाजीराव पाटील यांना आदेश दिले होते. निरीक्षक पाटील यांना खबऱ्याकडून वाल्मिकी-आंबेडकर घरकुल परिसरातील मुले घरफोड्या, चोऱ्या करत असल्याची माहिती मिळाली. घरकुल परिसरातील रूम नं. 1164 मध्ये घरफोडीतील साहित्य व घातक हत्यारे लपवून ठेवल्याचेही समजले. त्यानुसार पाटील यांनी एलसीबीच्या खास पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले. 

सकाळी सहा वाजता पथकाने बिल्डिंग नं. 49 मधील रूम नंबर 1164 वर छापा टाकला. तेथे चोरी व घरफोडीतील साहित्य, सुरा, कोयता आणि तीन दुचाकी मिळाल्या. जावेद गवंडी, सोहेल शेख याला अटक केली. तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून शहर पोलिस ठाण्यातील चार गुन्हे, विश्रामबागचे दोन, संजयनगरचा एक असे सात गुन्हे उघडकीस आणले. तसेच मिरज व विश्रामबाग पोलिस ठाण्यातील घरफोडीच्या गुन्ह्यात पाहिजे असलेल्या अल्पवयीन मुलास देखील पोलिसांनी ताब्यात घेतले. अटकेतील आरोपींना शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. 

एलसीबीचे सहायक पोलिस निरीक्षक अमितकुमार पाटील, कर्मचारी अमित परीट, मेघराज रूपनर, संदीप पाटील, विकास भोसले, शशिकांत जाधव, प्रकाश पाटील, श्री. गुंडवडे, दीपाली कोळी यांच्या पथकाने कारवाई केली. 

Web Title: Burglary gang Clamped