धुण्यासाठी नेलेली बस नदीत बुडाली!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 मे 2018

पाटण (जि. सातारा) : कोयनानगर येथे नदी पात्रात धुण्यासाठी नेलेली ट्रॅव्हल्स बस कोयना नदी पात्रात अचानक पात्रात गेली. बसमध्ये कोणीही नसल्याने कोणताही अनर्थ घडला नाही.

याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, काल मुंबईवरुन प्रवाशी घेऊन आलेली दत्त चिले ट्रॅव्हल्सची बस नेहमीप्रमाणे चालकाने प्रवाशी उतरल्यानंतर कोयनानगर येथील पुला शेजारी धुण्यासाठी नेली.

बस नदीकाठाशेजारी उतारावर उभी करुन चालक खाली उतरला. मात्र बस उभी करताना चालकाने बंद केले परंतु त्यास हॅन्ड ब्रेक लावायचा विसरुन गेला. काही कालावधी झाल्यानंतर बसला उतारामुळे अचानक गती मिळाली व बस नदी पात्रात मध्यभागी गेली.

धरणातुन पाणी सोडलेले असल्याने बस निम्मी बुडाली. चालकाने ग्रामस्थांच्या साह्याने जेसीबी आणून बस नदीपात्रातून बाहेर काढली. बसमध्ये कोणीही नसल्याने कोणताही अनर्थ घडला नाही.

Web Title: Bus drowned in river near Koynanagar