बस स्थानकातील मार्ग बदलले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

सातारा - पोवई नाका येथे ग्रेड सेपरेटरचे काम सुरू असल्याने शहरातील वाहतूक पर्यायी रस्त्यांवरून वळविण्यात आली आहे. त्यामुळे बस स्थानकात ये- जा करणाऱ्या बसची स्थानकासमोर गर्दी होऊन वाहतूक कोंडी होत होती. पोलिसांनी त्यावर उपाय म्हणून इन आणि आऊट गेट बदलून, तसेच समोरील डिव्हाडर काढून तोडगा काढला आहे. याबाबतचा पर्याय ‘सकाळ’नेही सातत्याने मांडला होता. 

शहराचे हृदय असलेल्या पोवई नाक्‍यावर ग्रेड सेपरेटरचे काम सुरू असल्याने या आठ रस्त्यांवरील वाहतूक विविध पर्यायी मार्गांवरून वळविली आहे. हे करताना या मार्गांवरील अतिक्रमणे, अडथळे काढले नसल्याने ‘सकाळ’ने त्यावर सातत्याने आवाज उठवला. त्याची दखल घेत पालिका, पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभागाने काही अतिक्रमणे काढली. तज्ज्ञांच्या माध्यमातून बस स्थानकासमोरील कोंडी सोडविण्याचे उपायही सुचविण्यात आले होते. पोलिस अधीक्षक संदीप पाटील, पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सुरेश घाडगे यांनी बस स्थानकाचे द्वारे बदलण्याचा, तसेच समोरील डिव्हायडर काढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तेथील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत झाली. पूर्वी आत येणारी आणि बाहेर जाणारी बस समोरासमोर येत असल्याने तसेच डिव्हायडरमुळे बस वळविण्यास अडचण होत असल्याने वाहतूक कोंडी होत होती. आता ती कमी होईल.

वाहतूक वळवण्याची गरज
राजपथावरून येणारी वाहतूक मरिआई कॉम्प्लेक्‍स ते महाराजा हॉटेल, मोनार्क चौक या रस्त्यावरून कऱ्हाड, गोडोलीकडे वळविली आहे. अनेक वाहनचालक कोठूनही या बाजूकडे वळतात. त्यामुळे नाक्‍यावरून, मोनार्क चौकातून येणारी वाहनांची समोरासमोर कोंडी होते. ते टाळण्यासाठी राजपथावर बॅरेकेटस लावून मोनार्क चौकाकडे वाहतूक वळविण्याची गरज आहे.

Web Title: bus stop route change ST Depo