आत्महत्येप्रकरणी चौघांवर गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

सोलापूर : अनैतिक संबंधाच्या कारणावरून अनुप राजेंद्र निकते (वय 34) यांनी आत्महत्या केल्याप्रकरणात चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. अश्‍विनी निकते, मिरा निकते, चेतन निकते, राहूल रासकर अशी आरोपींची नावे आहेत.

28 मेला दुपारच्या सुमारास अनुप यांनी आत्महत्या केली. त्यांची आई सुनीता राजेंद्र भडंगे (वय 51, रा. पश्‍चिम मंगळवार पेठ, सोलापूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. आत्महत्येपूर्वी अनुप यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. अश्‍विनी व राहूल या दोघात असलेल्या अनैतिक संबंधाच्या कारणावरून अनुप हे मानसिक तणावाखाली होते. अश्‍विनी, मिरा व चेतन या तिघांनी पोलिसात तक्रार देतो म्हणून अनुप यांना धमकी देत होते. त्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: case file against 4 person for suicide attempt