सीसीटीव्ही रेकॉर्डिंगचा तपास करणारी नवीन यंत्रणा कार्यरत

सीसीटीव्ही रेकॉर्डिंगचा तपास करणारी नवीन यंत्रणा कार्यरत

सांगली - चेन स्नॅचिंग..चोरी किंवा अन्य गुन्ह्यांचे "सीसीटीव्ही‘ मध्ये चित्रीकरण झाल्यानंतर संशयितांची ओळख पटवण्यासाठी राज्य गुन्हे अन्वेषणच्या संकल्पनेतून सर्व जिल्ह्यात स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे "क्‍लाऊड व्हिडिओ मॅनेजमेंट सिस्टीम‘ सुरू करण्यात आली आहे. पोलिस ठाण्यांच्या हद्दीत घडणाऱ्या गुन्ह्यांचे चित्रीकरण "अपलोड‘ केल्यास अधिक माहिती पोलिसांना मिळणार आहे.

पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील कॅमेरे किंवा सराफी पेढ्या, दुकाने, ऑफिस, कंपन्या किंवा घरातील कॅमेऱ्यांत चित्रीकरण होते. गुन्हा घडल्यानंतर पोलिस परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रीकरण आहे की नाही, याचा शोध घेतात. चित्रीकरण मिळाल्यास फिर्यादी किंवा इतरांकडून संशयितांची ओळख पटवण्याचा प्रयत्न होतो. बऱ्याचदा चित्रीकरण मर्यादित लोकांकडून तपासले जात असल्यामुळे तपासात उपयोग होत नाही.

"सीसीटीव्ही‘ तील चित्रीकरणाचा पोलिस तपासात उपयोग व्हावा, म्हणून राज्य गुन्हे अन्वेषणने "क्‍लाऊड व्हिडिओ मॅनेजमेंट सिस्टीम‘ प्रणाली सुरू केली आहे. सर्व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात ती सुरू झाली आहे. पोलिस ठाणे हद्दीत एखादी घटना घडल्यानंतर "क्राईम सीन व्हिडिओ‘ मिळाले तर संशयिताची ओळख पटवण्यासाठी त्याचा उपयोग होईल. हे चित्रीकरण एलसीबीच्या "क्‍लाऊड व्हिडिओ मॅनेजमेंट‘ कडे पाठवले जाणार आहे. चित्रीकरण अपलोड केल्यानंतर पुढील तपासासाठी उपयोग होईल.

सीसीटीव्हीतील चित्रीकरण सिस्टीमवर आल्यानंतर संशयितांची ओळख पटवण्याचा प्रयत्न होईल. संबंधिताच्या वर्णनावरून तो पोलिस रेकॉर्डवर आहे काय? हे तपासले जाईल. रेकॉर्डवर असेल तर तत्काळ माहिती उपलब्ध होईल. राज्यभर यंत्रणेत असल्यामुळे व्यापक तपासासाठी चित्रीकरण उपयुक्त ठरेल. क्‍लाऊड व्हिडिओ मॅनेजमेंट सिस्टीम जिल्ह्यात कार्यान्वित झाली आहे. प्रत्येक जिल्ह्यात "नोडल‘ अधिकारी नियुक्त केले आहेत. पोलिस ठाण्यांना "क्राईम सीन व्हिडिओ‘ या यंत्रणेकडे देण्याच्या सूचना आहेत. तिचा गुन्ह्यांच्या तपासात उपयोग करून घेण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणाही अद्ययावत असणे गरजेचे आहे.

चेन स्नॅचिंग, चोरीचा तपास
चेन स्नॅचिंग, बॅग लिफ्टिंग किंवा चोरी करून जाताना चोरटे सीसीटीव्हीत चित्रित झाल्यास त्याचा उपयोग करून तपास खोलवर जाऊन करण्यासाठी होईल. पोलिसांना यंत्रणेची चांगली मदत मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com