युवानेते राहुल चव्हाणांच्या वाढदिवसनिमित्त टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

जयभीम कांबळे
शनिवार, 21 एप्रिल 2018

तळमावले (सातारा) : येथे युवा नेते मा. राहुल चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन तळमावले येथील काकासाहेब चव्हाण मैदानात गेले चार दिवसपासून भरवण्यात आले होते. आज या स्पर्धेच्या अंतिम दिवशी विजयी संघांना पारितोषिक व राहुल चव्हाण दादा यांचा वाढदिवस हा एकत्रित कार्यक्रम पार पडला. राजे संघर्ष प्रतिष्ठान च्या वतीने या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या क्रिकेट सामन्यात इंद्रजित गुजर स्पोर्ट्स क्लब रेंदाळ ने एक लाख रकमेचे पाहिले पारितोषिक जिंकले तर दुसरे पारितोषिक जांभुळवाडी (कुंभारगाव) क्रिकेट संघाला पन्नास हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले. 

या पारितोषिक वितरणावेळी उद्योजक योगेश पाटणकर यांनी त्यांनी जाहीर केलेले प्रथम विजेता संघाला एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करून ग्रामीण भागातील क्रिकेट स्पर्धेला एक नवीन दिशा दिल्यामुळे ही मोठी स्पर्धा पार पडली.

काँग्रेसचे युवा नेते राहुल चव्हाण यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ढेबेवाडी-तळमावले विभागातील कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती.

या कार्यक्रमावेळी उद्योजक योगेश  पाटणकर, इंद्रजित गुजर, बी. के चोरगे, राकेश चाळके शेठ, सरपंच संदीप टोळे, दीपक चव्हाण, श्रीरंग चाळके, संदीप पाचूपते, संदीप सावंत, सचिन चव्हाण, सुरेश घराळ, संजय गुरव, दीपक वाघ, संदीप देवळेकर, , त्रिमूर्ती स्पोर्ट क्लब धामणी सदस्य, ग्रामविकास मंडळ मुबंई-गलमेवाडी,  तसेच राजे संघर्ष प्रतिष्ठान चे रमेश नावडकर, प्रवीण पाचूपते, सचिन काजारी, सागर नलवडे सह सर्व सदस्य उपस्थित होते.

Web Title: celebrated birth day of youth leader rahul chavan