पंचायत समिती सभापतिपदासाठी फिल्डिंग

पंचायत समिती सभापतिपदासाठी फिल्डिंग

भाजप-राष्ट्रवादीकडे प्रत्येकी ३; शिवसेना, संयुक्त प्रत्येकी १, जत, मिरजेत भाजप काठावर

सांगली - जिल्ह्यातील दहा पंचायत समित्यांच्या सभापती, उपसभापतींच्या निवडी मंगळवारी (ता. १४) करण्यात येणार आहेत. त्यासाठी इच्छुकांनी फिल्डिंग लावली आहे. दहा पंचायत समित्यांपैकी कडेगाव, पलूस, आटपाडी येथे भाजपला स्पष्ट, तर जत आणि मिरज पंचायत समितीत काठावरचे बहुमत आहे. खानापुरात शिवसेना, शिराळ्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची संयुक्त सत्ता आणि वाळवा, तासगाव, कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत आहे. 

कडेगाव पंचायत समितीत भाजपला स्पष्ट बहुमत आहे. सभापतिपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. सभापतिपदी मंदाताई करांडे यांची, तर उपसभापतिपदी रवींद्र कांबळे यांची निवड अंतिम मानली जात आहे. पलूस पंचायत समितीचे सभापतिपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे.

येथे सीमा मांगलेकर यांची वर्णी शक्‍य आहे. उपसभापतिपदी दीपक मोहिते व अंकुश पवार यांच्या नावांची चर्चा आहे.  आटपाडी पंचायत समितीवर भाजपला स्पष्ट बहुमत आहे. येथे सभापतिपद खुले आहे. याठिकाणी माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांचे पुत्र हर्षवर्धन देशमुख यांची निवड निश्‍चित मानली जाते. उपसभापतिपदी गोपीचंद पडळकर गटातील तानाजी यमगर प्रबळ दावेदार मानले जातात. खानापूर पंचायत समितीवर शिवसेनेचे बहुमत आहे. सभापतिपद खुले आहे. येथे सुहास बाबर यांची सभापतिपदी निवड निश्‍चित मानली जाते. उपसभापतिपदी कविता देवकर, मनीषा बागल यांच्या नावांची चर्चा आहे. शिराळा पंचायत समितीत काँग्रेस आघाडीची सत्ता आहे. सभापतिपद अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव आहे. 

येथे मांगले गणातील मायावती कांबळे यांची सभापतिपदी वर्णी लागण्याची शक्‍यता आहे. तर उपसभापतिपदासाठी सम्राटसिंह नाईक, बाळासाहेब नायकवडी यांची नावे चर्चेत आहेत. वाळवा पंचायत समितीवर राष्ट्रवादीने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. येथे सभापतिपद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहे. यासाठी सचिन चव्हाण व उपसभापतिपदासाठी देवराज पाटील प्रबळ दावेदार असतील.

मिरज पंचायत समितीत भाजपला काठावरचे बहुमत मिळाले आहे. सभापती-उपसभापती निवडीत भाजप, दोन्ही काँग्रेस नेत्यांची कसोटी लागणार आहे. सभापतिपद ओबीसी महिलेसाठी राखीव आहे. येथे कवलापूर, एरंडोली, सलगरे गणातील सदस्यांना लॉटरी लागेल. भाजपला २२ पैकी ११ जागा मिळाल्या आहेत. काठावरच्या बहुमतावर भाजप सत्ता स्थापन करेल. खटावच्या जनाबाई कदम एकमेव सदस्य सभापतिपदी पात्र आहेत. 
कवठेमहांकाळ पंचायत समितीत राष्ट्रवादी, माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाचे वर्चस्व आहे. सभापतिपद खुले आहे. त्यासाठी मनोहर पाटील, मदन पाटील यांची, तर उपसभापतिपदासाठी जोत्स्ना माळी यांच्या नावांची चर्चा आहे. तासगाव पंचायत समितीवर राष्ट्रवादीचे बहुमत आहे. सभापतिपद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहे. माया एडके, मनीषा माळी सभापतिपदासाठी इच्छुक आहेत. उपसभापतिपदासाठी संभाजी पाटील, संजय जमदाडे यांच्या नावांची चर्चा आहे. 

जत तालुका पंचायत समितीत भाजपला काठावरचे बहुमत आहे. सभापतिपद महिला खुल्या गटासाठी राखीव आहे. येथे भाजपकडून मंगल जमदाडे, सुशीला तावशी यांची नावे चर्चेत आहेत. तर काँग्रेसकडून अश्‍विनी चव्हाण यांचे नाव चर्चेत आहे.
 

पंचायत समिती सभापती आरक्षण असे 
सर्वसाधारण - खानापूर-विटा, कवठेमहांकाळ, आटपाडी.
सर्वसाधारण महिला - जत, पलूस, कडेगाव.
नागरिकांचा मागास प्रव र्गः तासगाव, वाळवा.
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ः मिरज
अनुसूचित जाती, महिला - शिराळा
 

पंचायत समितीमधील पक्षीय बलाबल
शिराळा : राष्ट्रवादी- ४, काँग्रेस- ३, भाजप-१
खानापूर : शिवसेना-५, काँग्रेस-१
कवठेमहांकाळ : स्वाभिमानी आघाडी-४, राष्ट्रवादी-३, विकास आघाडी-१
वाळवा : राष्ट्रवादी-१२, रयत विकास-७, काँग्रेस-३
जत : भाजप- ९, काँग्रेस-७, 
वसंतदादा विकास आघाडी-१, जनसुराज्य-१
आटपाडी : भाजप-४, काँग्रेस-२, राष्ट्रवादी-२
तासगाव : राष्ट्रवादी-७, भाजप-५
कडेगाव : भाजप-६, काँग्रेस-२.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com