चेंबर ऑफ कॉमर्सची आज निवडणूक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

कोल्हापूर - कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या 20 संचालकांच्या निवडीसाठी बुधवारी (ता.4) मतदान होत आहे. निवडणुकीत 23 पैकी 3 जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे 20 जागांसाठी उद्या मतदान होणार असून त्यासाठी 28 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. संस्थेच्या कार्यालयात सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यानंतर लगेच मतमोजणीस सुरवात होईल. 

चेंबर ऑफ कॉमर्सची 23 संचालकांच्या जागेसाठी निवडणूक जाहीर झाली. यामध्ये संलग्न संस्था सभासद गटातून 5, औद्योगिक संस्थांमधून 5, व्यापारी संस्थांमधून 10, कार्पोरेट सभासदांमधून 2 व मानद सभासदांमधून 1 प्रतिनिधी निवडावयाचा आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर ती बिनविरोध करण्याच्या हालचाली सत्तारूढ आघाडीने सुरू केल्या. त्यामध्ये त्यांना यश आले नाही; मात्र तीन जागा त्यांच्या बिनविरोध निवडून आल्या. 

निवडणुकीत व्यापारी-उद्योग विकास आघाडी (जुने पॅनेल) व उद्योग व्यापार परिवर्तन क्रांती आघाडी यांच्यात लढत आहे. विरोधकांनाही 23 जागांवर उमेदवार मिळू शकले नाहीत. त्यांना आठ जणांचे पॅनेल करावे लागले. त्यामुळे रिंगणात 28 उमेदवार राहिले. त्यातून वीस जणांची निवड करण्यासाठी उद्या मतदान होणार आहे. यासाठी 424 सभासद मतदानाचा हक्‍क बजाविणार आहेत. व्यापारी गटातून सर्वात जास्त उमेदवार असल्यामुळे या गटातील निवडणूक अधिक चुरशीची होणार आहे. विरोधी परिवर्तन क्रांती आघाडीच्या उमेदवारांना कोल्हापूर जिल्हा व्यापारी महासंघाचे सदानंद कोरगावकर यांनी वैयक्‍तिक पाठिंबा जाहीर केला आहे. व्यापारी गटातील 10 जागांसाठी 16 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. बऱ्याच वर्षानी होत असलेल्या या निवडणुकीकडे व्यापारी व उद्योजकांचे लक्ष लागले आहे. मतदान झाल्यानंतर दुपारी चार वाजता मतमोजणीस सुरवात होणार आहे.

Web Title: Chamber of Commerce today election