उदयनराजेंच्या इलाक्‍यात पहिल्यांदाच आलोय - छत्रपती संभाजीराजे

Chatrapati Sambhajiraje Meets Udayanraje Bhosale
Chatrapati Sambhajiraje Meets Udayanraje Bhosale

भिलार : वाघ आपल्या जंगलाचा राजा असतो. आज पहिल्यांदाच मी उदयनराजेंच्या इलाक्‍यात आलोय. येण्याआधी मी दचकत होतो. पण, पाचगणी घाटाच्या वर असल्याने थोडासा सावरलो. कारण पाचगणी कॉस्मोपोलिटन शहर आहे, असा बचावात्मक पवित्रा घेत खासदार संभाजीराजे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावरील आपले प्रेम अधोरेखित केले. 

पाचगणी येथील रोटरी क्‍लबच्या पदग्रहण समारंभासाठी रविवारी (ता. 29 जुलै) शहरात प्रथमच आलेल्या संभाजीराजेंनी हळूवारपणे उदयनराजेंच्या जिव्हाळ्याचे संबंध खास शैलीत उलगडले. राज्यात सातारा आणि कोल्हापूरची गादी एक आहे. या दोन्ही गाद्यांविषयी जनसामान्यांमध्ये आदराचे स्थान आहे. हाच धागा पकडून संभाजीराजे म्हणाले, 'या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रथमच मी पाचगणीत आलो. हा भाग आमच्या उदयनराजेंच्या इलाक्‍यात आहे. पण, पाचगणी सर्वधर्मसमभाव जपणारे शहर असल्याने माझे इकडे येण्याने काही अडचण होणार नाही.' या भागात माझे मित्र कमी होते. पण, आज मला नवीन कुटुंब मिळाले असल्याची भावनिक प्रतिक्रिया देत संभाजीराजेंनी यापुढे माझा पहिला "स्टॉप' पाचगणी राहील, असे स्पष्ट केले. 

मराठा आरक्षणाचे नेतृत्व उदयनराजेंना बरोबर घेऊनच करणार असून नेतृत्व त्यांनी केले काय आणि मी केले काय? प्रश्‍न सुटणे महत्त्वाचे आहे. आरक्षण मिळवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी राजीनामे देऊन प्रश्न सुटणार नाहीत. त्यापेक्षा त्यांनी पदावर राहूनच आग्रह धरावा. - छत्रपती संभाजीराजे

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com