मिरज तालुक्यातील चाबुकस्वारवाडीमध्ये कोल्ह्याला जीवदान

मिरज तालुक्यातील चाबुकस्वारवाडीमध्ये कोल्ह्याला जीवदान

सांगली - तब्बल चार दिवसांपासून खोल विहिरीमध्ये पडलेल्या कोल्ह्याला गावकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने जीवदान देण्यात यश आले आहे. मिरज तालुक्यातील चाबुकस्वारवाडी येथे ही घटना घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की बाळासाहेब गुंडेवाडी यांच्या शेतामध्ये खोल विहीर आहे. या विहिरीमध्ये गेल्या चार दिवसांपासून अवघे दोन वर्षे वय असणारा कोल्हा विहिरीमध्ये पडला होता. विहिरीकडे कोणाचे लक्ष गेले नसल्यामुळे तो कोल्हा विहिरीमध्येच अडकून पडला होता. गावातील काही लोकांना काल सायंकाळी कोल्हा विहिरीमध्ये पडला असल्याचे निदर्शनास आले. कोल्ह्याला पाहण्यासाठी लोकांनी विहिरीजवळ गर्दी केली. काही मंडळींनी वन अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच वनाधिकारी सुनील कणसे यांनी तातडीने धाव घेत सामाजिक कार्यकर्ते आणि गावकऱ्यांच्या मदतीने कोल्ह्याला जीवदान देण्यासाठी प्रयत्न सुरु केले. तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर विहिरीतून कोल्ह्याला बाहेर काढण्यात आले. या कोल्ह्याला खाऊ घालून गावकऱ्यांनी निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com